आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीशाही नापास, लोकशाही पास; राजीनाम्याआधी येदियुरप्पांचे 20 मिनिटे भावुक भाषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराभवाच्या शुभेच्छा देतांना शोभा कारनदलाजे,मल्लिकार्जुन खरगे,अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, अनंतकुमार , सदानंद गौडा - Divya Marathi
पराभवाच्या शुभेच्छा देतांना शोभा कारनदलाजे,मल्लिकार्जुन खरगे,अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, अनंतकुमार , सदानंद गौडा

> भाजपने बहुमत नसतानाही सरकार स्थापनेचा दावा केला. १५ दिवसांची मुदतही घेतली. सुप्रीम कोर्टाने एक दिवसाची मुदत दिली तेव्हा आमदारांचा पाठिंबा मिळवू शकले नाही. त्यामुळे राजीनामा दिला. ४ वर्षांच्या मोदी राजवटीत प्रथमच असे घडले आणि ते नापास झाले.

 

> १०४ आमदारांचा पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही आणि ३८ आमदार असलेल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार आहे. असे फक्त भारतीय लोकशाहीतच घडू शकते. कारण बहुमताचा आकडा जमवला. हा खेळ बहुमताचा आहे. लोकशाहीचा विजय झाला.

 

बंगळुरू - कर्नाटकमध्ये ५५ तासांचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पांनी शनिवारी शक्तिपरीक्षणाआधीच राजीनामा दिला. आता काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन होईल. एच. डी. कुमारस्वामी सोमवारी दुपारी १२ ते १ दरम्यान शपथ घेतील. येड्डींना बहुमतासाठी मिळालेली १५ दिवसांची कालमर्यादा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारीच शक्तिपरीक्षणाचे आदेश दिले होते. शनिवारी सकाळी कोर्टाने शक्तिपरीक्षणाच्या थेट प्रसारणाचेही आदेश दिले. त्यानंतर चार तासांत घटनाक्रम एवढ्या वेगाने बदलला की १०१% विजयाचा दावा करणारा भाजप बॅकफूटवर गेला. चार टेपमध्ये भाजपवर आमदार खरेदीचे आरोपही झाले. काँग्रेसचे तीन बेपत्ता आमदारही आले. दीड वाजेपर्यंत भाजपला पराभवाची चाहूल लागली. त्यानंतर भावुक भाषणासह येड्डीयुरप्पांच्या राजीनाम्याची पटकथा तयार करण्यात आली.

 

तेव्हा देवेगौडा पीएम झाले होते, आता पुत्र सीएम होणार

तेव्हा भाजपचे वाजपेयी यांनी राजीनामा दिला होता आणि जनता दलाचे देवेगौडा पीएम झाले होते : १९९६ मध्ये वाजपेयींना १३ दिवस पीएम राहिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. भाजप १६१ खासदारांसह सर्वात मोठा पक्ष होता. १४४ खासदारांचा दुसरा सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच्या पाठिंब्याने ४४ खासदार असलेले देवेगौडा पंतप्रधान झाले होते.

 

२२ वर्षांनी तीच कथा, पात्रांत बदल; काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारस्वामी सीएम होणार : १०४ आमदारांच्या सर्वात मोठ्या पक्षाचे येड्डीयुरप्पांना राजीनामा द्यावा लागला. आता देवेगौडांचे पुत्र, ३७ आमदार असलेले कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील. त्यांना काँग्रेसच्या ७८ आमदारांचा पाठिंबा आहे.

 

जेडीएसचे सरकार बनावे, अशी कर्नाटक टीमची हाेती इच्छा; शहा अडून बसल्याने बनले हाेते येड्डींचे सरकार

भाजपचे रणनीतिकार अल्पमतातील सरकार स्थापण्यास अनुकूल नव्हते; परंतु अमित शहा हे अडून बसल्याने येड्डीयुरप्पांनी शपथ घेतली. सूत्रांनुसार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका वठवणारे राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांचे मत हाेते की, बहुमताचे समीकरण त्वरित जुळवून अाणणे साेपे नाही. त्यामुळे प्रथम काँग्रेस-जेडीएसला सरकार स्थापन करू द्यावे. फ्लाेअर टेस्टसाठी राज्यपाल त्यांना मुदत देतील. यादरम्यान अामदारांना फाेडून सरकार पाडले जाऊ शकते; नाही तर ५-६ महिन्यांत अाघाडीमध्ये निश्चितच वाद हाेतील. ते पाहता लाेकसभा निवडणुकीच्या जवळपास कुमारस्वामी सरकार पाडू शकताे; परंतु शहा यांनी सरकार स्थापनेचा पर्याय निवडला, तर अामदारांना जमवण्याची जबाबदारी येड्डींचे विराेधक साेमशेखर रेड्डींवर साेपवण्यात अाली. मात्र, विराेधकांची घेरावबंदी व सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने शहा यांच्या रणनीतीवर पाणी फेरले. 

 

हेहि वाचा , डी. के. शिवकुमार काँग्रेसचे नेते; ज्यांनी विलासराव, पटेलांनंतर राजकीय शत्रू कुमारस्वामींना वाचवले

 

 

 

बातम्या आणखी आहेत...