आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक भाजपला नव्हती सत्ता स्थापनेची इच्छा, दिल्लीकरांच्यामुळे हट्टामुळे झाला सगळा ड्रामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
104 आमदारांचा विजय झाल्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.-फाइल - Divya Marathi
104 आमदारांचा विजय झाल्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.-फाइल

- विरोधकांनी घेरल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाजपच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले. 

- काँग्रेसने 4 टेप जारी करत भाजपवर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. 

 

नवी दिल्ली - भाजपची रणनिती आखणारे अल्पमताचे सरकार स्थापण्याच्या बाजुने नव्हते. पण दिल्लीतील मोठे नेते अडून बसल्याने येडियुरप्पा यांनी शपथ घेतली होती. सुत्रांच्या मते, निवडणुकीत महत्त्वाच्या भूमिकेत राहिलेले राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या मते, बहुमताचा जुगाड एवढ्या लवकर शक्य नव्हता. आधी काँग्रेस-जेडीएसला सत्ता स्थापन करू द्यावी. राज्यपाल त्यांना फ्लोर टेस्टसाठी 10-15 दिवस देतील. तेव्हा आमदार फोडून सरकार पाडता येऊ शकते. तसे झाले नाही तरी 5-6 महिन्यात आघाडी सरकारमध्ये वाद होतीलच. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या वेळी सरकार पाडता येऊ शकते. पण दिल्लीतील नेतृत्वाला सत्ता स्थापन करण्याची इच्छा होती. आमदार गोळा करण्याचे काम येडियुरप्पांचे विरोधी असलेल्या सोमशेखर रेड्‌डींना सोपवण्यात आले. पण विरोधी आमदारांनी आखलेली रणनिती आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. अगदी तुमकुर मठाचे धर्मगुरू शिवकुमार स्वामी यांनाही लिंगायत आमदारांशी संपर्क करता आला नाही. 


फ्लोर टेस्टपूर्वीच येडियुरप्पा नापास 
कर्नाटकात 55 तासांचे मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पा यांना शनिवारी सायंकाळी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा द्यावा लागला. राज्यपालांनी येडियुरप्पा यांना बहुमक सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. पण सुप्रीम कोर्टाने मुदत कमी करत फक्त एका दिवसाची मुदत दिली. कोर्टाने शनिवारी सकाळी फ्लोर टेस्टचे थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर 4 तासांत संपूर्ण घटनाक्रम वेगाने बदलला. विजयाजचा 101% दावा करणारा भाजप पक्ष बॅकफूटवर आल्याचे दिसले. काँग्रेसने 4 टेप जारी करत भाजपवर आमदार खरेदी केल्याचा आरोप केला. काँग्रेसचे 3 बेपत्ता आमदारही परतले. दीड वाजेपर्यंत भाजपला पराभवाची कुणकूण लागली. त्यांतर भावूक भाषणानंतर येडियुरप्पांना राजीनामा दिला. 


चित्रपट होता.. 20 साल बाद, हा आहे.. 22 साल बाद
1996 मध्ये वाजपेयींना 13 दिवसांचे पंतप्रधान राहिल्यानंतर 1 जूनला राजीनामा द्याला लागला होता. भाजप 161 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 144 खासदारांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर 44 खासदार असलेले देवेगौडा पंतप्रधान बनले होते. 


22 वर्षांनी फक्त पात्र बदलले
काँग्रेसच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी सीएम : 104 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या येडियुरप्पा यांना बहुमत जमवता न आल्याने राजीनामा द्यावा लागला आहे. आता देवेगौडा यांचा मुलगा आणि तिसऱ्या क्रमांकावरील 37 आमदार असलेले कुमारस्वारी मुख्यमंत्री बनतील. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या 78 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. 

 

बुधवारी घेणार शपथ 
कुमारस्वामी बुधवारी शपथ घेतील. आधी सोमवारचा दिवस ठरला होता. पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीमुळे शपथविधी पुढे ढकलण्यात आला. राज्यपालांनी कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...