आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीजी तुम्ही खूप बोलता पण जे काही बोलता तसे करत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी अमेठी आणि दिल्लीमध्ये म्हणाले होते, आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. मी 15 मिनिटे भाषण केले तर मोदी आमच्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. (फाइल) - Divya Marathi
राहुल गांधी अमेठी आणि दिल्लीमध्ये म्हणाले होते, आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. मी 15 मिनिटे भाषण केले तर मोदी आमच्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. (फाइल)

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी नरेंद्र मोदींवर एकापाठोपाठ एक हल्ला करत आहेत. त्यांनी शनिवारी पुन्हा रेड्डी ब्रदर्सना तिकिट देण्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. एक व्हिडिओ प्रसिद्ध करत राहुल यांनी मोदींना तीन प्रश्न विचारले. राज्यातील भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरूही त्यांनी समाचार घेतला. यापूर्वी 1 मे रोजी मोदींनी राहुल गांधींना कागद न पाहता 15 मिनिटे भाषण करण्याचे आणि 5 वेळा विश्वेश्वरैया म्हणण्याचे आव्हान केले होते. त्यावर राहुल गांधींनी हे प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. 


मोदीजी तुम्ही बोलता बरेच काही, पण करत नाही.. 
- राहुल गांधींनी शनिवारी ट्वीटमध्ये लिहिले, प्रिय मोदीजी तुम्ही खूप बोलतात. पण अडचण आहे की, तुमची कामे आणि तुमचे शब्द यांचा एकमेकांशी संबंध लागत नाही. 
- त्यांनी ट्वीटबरोबर एक व्हिडिओदेखिल शेअर केला आणि लिहिले की, तुम्ही हा 'कर्नाटक  मोस्टवांटेड' मालिकेप्रमाणेही पाहू शकता. 
- हा व्हिडिओ 1 मिनिट 20 सेकंदांचा आहे. 


3 प्रश्न विचारले, आरोपही केले 
- तुम्ही रेड्डी ब्रदर्स गँगला 8 तिकिटे दिली यावर 5 मिनिटे बोलाल का?
- असा व्यक्ती (येदियुरप्पा) ला मुख्यमंत्री बनवाल ज्याच्यावर 23 खटले दाखल आहेत? 
- तुम्ही तिकिट दिलेल्या त्या 11 नेत्यांवर बोलाल का जे भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत? 
- व्हिडिओमध्ये या सर्व नेत्यांचे आरोप आणि केसची माहिती दिली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...