• Home
  • National
  • Delhi
  • कुमारस्वामींचा खळबळजनक आरोप: प्रत्येक आमदाराला भाजपची 100 100 कोटींची ऑफर, आता कुठे आहेत प्राप्तिकर अधिकारी? Karnataka Government Formation News And Updates

कुमारस्वामी म्हणाले- भाजपची / कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले

LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू, पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामी म्हणाले- भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू , पण कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले.LIVE: कुमारस्वामींचा दावा- प्रत्येक आमदाराला भाजपची 100-100 कोटींची ऑफर, आता कुठे आहेत प्राप्तिकर अधिकारी?.LIVE: कुमारस्वामींचा दावा- प्रत्येक आमदाराला भाजपची 100-100 कोटींची ऑफर, आता कुठे आहेत प्राप्तिकर अधिकारी?.LIVE: काँग्रेसच्या बैठकीत 12 आमदार आले नाहीत, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: काँग्रेसच्या बैठकीत 12 आमदार आले नाहीत, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: काँग्रेसच्या बैठकीत 12 आमदार आले नाहीत, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: काँग्रेसच्या बैठकीत 12 आमदार आले नाहीत, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: येदियुरप्‍पांची भाजपच्या विधानसभा नेतेपदी निवड, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: येदियुरप्‍पांची भाजपच्या विधानसभा नेतेपदी निवड, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.LIVE: येदियुरप्‍पांची भाजपच्या विधानसभा नेतेपदी निवड, जेडीएसच्या बैठकीत 2 आमदारांची गैरहजेरी.कर्नाटक: काँग्रेस-जेडीएसचा भाजपवर आमदार फोडल्याचा आरोप, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही दिली ऑफर.कर्नाटक: भाजपकडून 10 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही कॉल आला होता.कर्नाटक: भाजपकडून 10 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही कॉल आला होता.कर्नाटक: भाजपकडून 10 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही कॉल आला होता.कर्नाटक: भाजपकडून 10 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही कॉल आला होता.कर्नाटक: भाजपकडून 10 आमदारांना मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस आमदार म्हणाला- मलाही कॉल आला होता.

दिव्य मराठी वेब टीम

May 16,2018 03:27:00 PM IST
> मुख्यमंत्री सिद्दारमैया बादामी मतदारसंघातून 1,696 मतांनी विजयी, चामुंडेश्वरीत 36,042 मतांनी पराभूत
> जपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येद्दियुरप्पा शिकारीपुरातून 8व्यांदा विजयी
> जेडीएस नेते कुमारस्वामी आपल्या दोन्ही जागा जिंकण्यात यशस्वी ठरले.

नवी दिल्ली - कर्नाटकात सत्तेसाठी भाजप आणि जेडीएस-काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावर तिन्ही पक्षांनी आमदारांच्या बैठका घेतल्या. तिन्ही पक्ष बहुमतासाठीचे 112 आमदार असल्याचा दावा करत आहेत. यादरम्यान, जेडीएस-काँग्रेसने भाजपवर आमदार फोडल्याचा आरोप केला आहे. जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच.डी. कुमारस्वामी म्हणाले की, ते लोक (भाजप नेते) पक्षाच्या आमदारांना 100-100 कोटी रुपयांची ऑफर देत आहेत. जेडीएसच्या बैठकीत दोन आमदार गैरहजर होते, तर काँग्रेसच्या मीटिंगमध्ये 12 आमदार आलेच नाहीत.

आम्ही भाजपची अश्वमेध यात्रा रोखली
- जेडीएस चीफ कुमारस्वामी म्हणाले- "भाजपची अश्वमेध यात्रा उत्तरेतून सुरू झाली, परंतु कर्नाटकात आम्ही त्यांचे घोडे रोखले. हा जनादेश भाजपची अश्वमेध यात्रा रोखण्यासाठी आला आहे. ऑपरेशन कमळ यशस्वी होण्याचे स्वप्न विसरून जा. जेडीएस आमदारांना भाजप 100-100 कोटींची ऑफर देत आहे. हा काळा पैसा कुठून आला? आता कुठे आहेत इन्कम टॅक्स ऑफिसर? ते तर गरीब जनतेचे सेवक मानले जातात. मग आज एवढे पैसे ऑफर कसे होत आहेत?"

- "असे व्यक्तीही आहेत जे भाजप सोडून आमच्यासोबत येऊ इच्छितात. जर तुम्ही आमचे आमदार फोडले आणि तुमचे दुप्पट फोडू. मी राज्यपालांनाही म्हटले आहे की, घोडेबाजाराला अटकाव घालावा."
- "मला दोन्ही बाजूंनी ऑफर होती. मी विचारपूर्वक बोलत आहे. 2004-05 मध्ये भाजपची साथ देण्याच्या माझ्या निर्णयामुळे माझ्या वडिलांच्या कारकीर्दीला डाग लागला होता. देवाने मला आता तो डाग पुसवण्याची संधी दिली आहे. म्हणून मी काँग्रेससोबत जात आहे."

> तथापि, आमदारांच्या गैरहजेरीचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे, काँग्रेस-जेडीएसने आरोप केला आहे की, भाजप त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही पक्षांनी दावा केला की, त्यांचे सर्व निवडलेले आमदार एकत्र आहेत. काँग्रेस आमदार अमरेगौड़ा लिंगानागौड़ा पाटिल बाय्यापुर म्हणाले की, भाजप नेत्यांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. यादरम्यान वृत्त आले आहे की, बी. एस. येद्दियुरप्पा यांनी पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले आहे. ते काँग्रेसचे 4 आणि जेडीएसच्या 6 आमदारांच्या संपर्कात आहेत. सर्वांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. तथापि, जेडीएस-काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. या निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएस आघाडीला 38 जागा मिळाल्या आहेत.

काय आहे ऑपरेशन कमळ?
- 2008 मध्ये भाजपला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 113 पेक्षा 3 जागा कमी होत्या. तेव्हा त्यांनी ‘ऑपरेशन कमळ’ चालवून सत्ता स्थापन केली होती.
- असे म्हटले जाते की, तेव्हा भाजपने पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचण्यासाठी काँग्रेसचे 3 आणि जेडीएसच्या 4 आमदारांना राजीनामा देण्यासाठी तयार केले होते. त्यांनी भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. यापैकी 5 आमदार विजयी झाले. याप्रकारे भाजप 110 ने वाढून 115 जागांवर गेली.

भाजपकडे काय आहे पर्याय?
- पहिला - जर भाजपला सत्ता स्थापनेची पहिली संधी मिळाली नाही आणि जर विधानसभेत बहुमत चाचणी झाली, तर ते जेडीएस-काँग्रेसच्या काही आमदारांना सदनात मतदानापासून गैरहजर राहण्यासाठी तयार करू शकते.
- दुसरा, जर भाजपला पहिली संधी मिळाली, तर ते आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यपालांना काही दिवसांचा अवधी मागू शकतात.

काँग्रेस - जेडीएसकडे काय आहे पर्याय?
- सरकार स्थापनेची संधी मिळाल्यास दोन्ही पक्ष रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू करू शकतात. म्हणजेच आपापल्या आमदारांना एखाद्या रिसॉर्टमध्ये पाठवू शकतात, जेणेकरून फ्लोअर टेस्टपर्यंत आमदार फोडण्याचा प्रयत्न होऊ नये.
- जर भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली, तर ते राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.

पक्ष बैठकीला काँग्रेसच्या 12, तर जेडीएसच्या 2 आमदारांची दांडी

- भाजप, जेडीएस आणि काँग्रेसच्या बुधवारी विधिमंडळ बैठका झाल्या. जेडीएसचे 2 आमदार राजा वेंकटप्पा नायक आणि वेकंट राव नडगौड़ा या बैठकीला गेले नाहीत. नायक मानवीतून आणि नडगौड़ा सिंधानुर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपने येद्दियुरप्पा यांना आणि जेडीएसने एच. डी. कुमारस्वामी यांना विधिमंडळाच्या नेतेपदी निवडले आहे.

- विधिमंडळ नेतेपदाच्या बैठकीनंतर बी. एस. येदियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. नंतर त्यांनी म्हटले की, पक्षाने माझी विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. मी राज्यपालांना पत्र सोपवले आहे. ते मला म्हणाले की, ते योग्य तो निर्णय घेतील. मला ते लवकर बोलवतील अशी आशा आहे.

- कर्नाटक प्रज्ञावंत पक्षाचे आमदार आर. शंकर राजभवनात भाजपच्या प्रतिनिधि मंडळासेाबत दिसले.

काँग्रेसचा दावा: भाजपचे 6 आमदार आमच्यासोबत
- काँग्रेसचे एम. बी. पाटील म्हणाले की, भाजपचे 6 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे, एन. हॅरिस म्हणाले की, आम्हाला जनतेच्या आदेशाचे जतन करावे लागेल. ते (भाजपा) गलिच्छ राजकारण करत आहेत. आम्हाला त्यांना रोखावे लागेल. आमच्याजवळ 118 आमदारांचे समर्थन आहे.

काँग्रेस आमदार म्हणाले- मी ऑफरला नकार दिला

- काँग्रेस आमदार अमरेगौडा लिंगानागौडा पाटील बाय्यापुर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मला भाजपच्या नेत्यांचा कॉल आला होता. ते म्हणाले की, आमच्यासोबत या आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ. परंतु मी नकार दिला. आमचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आहेत.

- काँग्रेस नेते डी. शिवकुमार म्हणाले की, ते (भाजप) आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. हे आम्हाला माहिती आहे. सर्वांवर खूप प्रेशर आहे. परंतु हे सोपे नाही, कारण दोन्ही पक्षांकडे बहुमताचा आकडा आहे. जनता हे सर्व पाहत आहे.
- दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले, सर्व काँग्रेस आमदार आमच्यासोबत आहेत. कोणीही बाहेर नाही. आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत.

येद्दियुरप्पा यांनी शपथेसाठी ठरवला 17 मेचा मुहूर्त
- सूत्रांनुसार, भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या आमदारांना ऑफर दिली आहे. त्यांना पक्ष कोणत्याही परिस्थितीत सपोर्ट करेल. जर या आमदारांनी भाजपला मते दिली वा फ्लोअर टेस्टदरम्यान गैरहजर राहिले, तर दोन्ही परिस्थितींत पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत यांचे सदस्यत्व जाणे निश्चित आहे. अशा वेळी भाजपने त्यांना आपल्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवण्याचा पर्याय दिला आहे. स्वत: न लढता यांनी ठरवले तर एखाद्या नातेवाइकाला लढवू शकतात. जर एखाद्या आमदाराला पोटनिवडणूक लढवायची नसेल तर त्याला विधान परिषदेत अॅडजस्ट केले जाईल.

- ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार, राज्यपाल बुधवारी भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. येद्दियुरप्पा यांनी शपथेसाठी 17 मेचा मुहूर्तही काढला आहे. ते 21 रोजी बहुमत सिद्ध करतील. आमदार फोडण्यावर येद्दियुरप्पा आणि राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. दुसरीकडे, रात्री उशिरापर्यँत काँग्रेस-जेडीएसचीही बैठक सुरू होती.

सध्याच्या परिस्थिती : भाजप सर्वात मोठा पक्ष, बहुमतापासून 8 जागा दूर
- राज्यात एकूण जागा 224 आहेत. बहुमतासाठी 113 आवश्यक.
- 2 जागांवर मतदान बाकी आहे. यासाठी बहुमताचा आकडा 112 आहे.

पक्ष 2018 2013 फरक
काँग्रेस 78 122 - 44
भाजप 104 40 +64
जेडीएस+ 38 40 -2
इतर 02 22 -18

कर्नाटकात सत्ता स्थापनेचे दोन फॉर्म्युले

1) फॉर्म्युला 1 - काँग्रेस + जेडीएस + इतर म्हणजेच (78+38+1=117)
- आकडे बहुमतापेक्षा जास्त आहेत. परंतु ही निवडणुकीनंतरची आघाडी आहे. अशा वेळी राज्यपालांवर कोणताही संवैधानिक वा नैतिक दबाव नाही की, या आघाडीला पहिली सिंधी द्यावी.

2) फॉर्म्युला 2 - भाजप+ गोळा केलेले आमदार म्हणजेच (104+8=112)
- भाजपला कमीत कमी 8 आमदारांची गरज आहे. अशा वेळी काँग्रेस वा जेडीएसचे कमीत कमी 8 आमदार फोडावे लागतील. सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी भाजपला संधी दिली तर त्यांना बहुमत तयार करण्यासाठी वेळ मिळेल.
- एक शक्यता अशी आहे की, या दोन्ही फॉर्म्युल्यांशिवाय एक तिसरी परिस्थिती व्हावी. निमंत्रण मिळाल्यानंतर भाजप बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरली, तर काँग्रेस-जेडीएसला गैरभाजप सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते.

राजभवनात राजकारण: काँग्रेसने राज्यपालांना दाखवला गोव्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल
- काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी मंगळवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली आणि गोव्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवला. म्हणाले- सर्वात मोठ्या पक्षाला संधी मिळणे गरजेचे नाही. कोर्ट म्हणाले होते, "सर्वात मोठ्या पक्षालाच शपथ देणे गरजेचे नाही. 2-3 पक्षांकडे जास्त संख्याबळ असेल तर त्यांनाही शपथ देऊ शकता.' काँग्रेस म्हणाले की- राज्यपाल याविरुद्ध जाऊ शकत नाहीत.

आता राज्यपाल वजुभाईंवर सर्व भिस्त
- सरकार कुणाचे येईल, हे सर्वस्वी राज्यपाल वजुभाई कुणाला निमंत्रण देतात यावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदींच्या गुजरातेत सीएम म्हणून 13 वर्षांच्या कार्यकाळात वजुभाईवाला 9 वर्षांपर्यंत अर्थमंत्री होते. 2001 मध्ये मोदींच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी वजुभाई यांनी राजकोट सीट सोडली होती.

पुढच्या स्लाइडवर पाहा, कर्नाटक निवडणुकीबाबतचे इन्फोग्राफिक्स...

X
COMMENT