आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर सिद्ध करणार बहुमत, सत्तेबाबत चर्चा नंतरच-खरगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- कुमारस्वामी यांनी 2006 मध्ये भाजपबरोबर 20-20 महिन्यांच्या वाटाघाटीचे सरकार स्थापन केले होते. 

- कर्नाटकात दोन उपमुख्यमंत्री केले जाणार असल्याची चर्चा आहे. 

 

नवी दिल्ली - काँग्रेस जेडीएसचे मंत्रिमंडळ आणि सत्तेमधील वाटाघाटीचा मुद्दा अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. काँग्रेस-जेडीएस यांच्या विविध खात्यांच्या वाटाघाटीबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी म्हटले, आमचा पहिला उद्देश विधानसभा अध्यक्षांची निवड हा आहे. नंतर बहुमत सिद्ध करण्यास महत्त्व दिले जाईल. या दोन्ही गोष्टींनंतरच इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता कुमारस्वामी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

 

सोमवारी सोनिया-राहुल आणि मायावतींना भेटले कुमारस्वामी
- यापूर्वी कुमारस्वामी यांनी सरकारमध्ये 30-30 महिन्यांची वाटाघाटी मान्य नसल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सर्व बाबी लक्षात घेता आम्हाला सत्तेत आमचा वाटा मिळायला हवा. 
- मंत्रिमंडळात वाटाघाटीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी कुमारस्वामी सोमवारी दिल्लीत राहुल गांधींना भेटायला पोहोचले. त्याआधी त्यांनी बसपा अध्यक्ष मायावती यांची भेट घेतली आणि निवडणुकीत पाठिशी राहिल्याबाबत आभारही मानले. 


शपथविधीला हे नेते उपस्थित राहू शकतात 
- सोनिया आणि राहुल यांच्याशिवाय कुमारस्वामी यांनी मायावती यांचीही दिल्लीत भेट घेतली. मायावतींबरोबरच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
- त्यांच्याशिवाय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (केरळ), अरविंद केजरीवाल (दिल्ली), ममता बॅनर्जी (प. बंगाल), के चंद्रशेखर राव (तेलंगणा), एन चंद्रबाबू नायडू (आंध्र प्रदेश) हेही शपथविधीला उपस्थित राहू शकतात. 


कुमारस्वामी म्हणाले, सत्तावाटपाबाबत चर्चा नाही 
- न्यूज एजन्सीच्या मते, जेडीएस-काँग्रेस सत्तेत 30-30 महिन्यांची वाटाघाटी झाल्याच्या चर्चा आहेत. कुमारस्वामी यांनी मात्र अशी काहीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 
- कुमारस्वामी यांनी सोमवारी सोनिया आणि राहुल यांची भेट घेतली. ते म्हणाले की, मी दोन्ही नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...