आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आघाडीतील बिघाडीचा इतिहास: धोका, सौदेबाजी अन् स्वार्थासाठी झाला वेळोवेळी घात Karnataka: Politics Of Alliance When Governments Collapsed

आघाडीतील बिघाडीचा इतिहास: धोका, सौदेबाजी अन् स्वार्थासाठी झाला वेळोवेळी घात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस मिळून सत्ता स्थापन करत आहेत. 23 मे रोजी कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान, वृत्त येत आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धरून एकूण 34 मंत्री असतील. यात 20 काँग्रेसचे तर मुख्यमंत्र्यांना धरून 14 मंत्री जेडीएसचे असतील. एनडीटीव्हीशी बोलताना एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, काँग्रेस आणि जेडीएसदरम्यान सरकार चालवण्याबाबत एक भागीदारीचा कार्यक्रम होईल. तथापि, आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. परंतु देशाच्या राजकारणात आघाडी सरकारांचा आतापर्यंत अनुभव फार चांगला नाही. अटीशर्थींनी अस्तित्वात येणारे सरकार नंतर 'सौदेबाजी', 'व्यक्तिगत स्वार्थ' आणि वैचारिक मतभेदांमुळे नेहमी कोसळले आहे. आता कर्नाटकात सरकारचे भविष्य काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणुकीत केवळ 38 जागा जिंकणारे जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असतील, 78 जागा मिळवणारी काँग्रेस पाठिंबा देईल आणि त्यांच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री असेल.

 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार किती टिकते ते येणारा काळच ठरवेल, पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आघाडीत बिघाडी झाल्याची काही ऐतिहासिक उदाहरणे... 

बातम्या आणखी आहेत...