आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच; पाेक्साे कायद्यात केंद्र दुरुस्ती करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काश्मीरमधील कठुअा व उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभर संताप व्यक्त हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांत फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याच्या दृष्टीने कायद्यात दुरुस्ती केली जाईल, अशी हमी महिला-बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी दिली. 


यासाठी अस्तित्वात असलेल्या ‘पोक्सो’ (लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचे संरक्षण) कायद्यात ही दुरुस्ती करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे गांधी म्हणाल्या.  १२ वर्षांखालील मुलींवर झालेल्या अत्याचारातील दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले कायदे राजस्थान, मध्य प्रदेश व हरियाणात अाहेत.

 

अलाहाबाद : काेर्टाच्या अादेशानंतर आमदाराला अटक
 उन्नावमधील बलात्कारप्रकरणी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश शुक्रवारी अलाहाबाद हायकोर्टाने दिले. यानंतर सीबीअायने तातडीने सेंगरला अटक केली. तत्पूर्वी त्याची १६ तास चाैकशी करण्यात अाली.


काय म्हणाल्या मेनका गांधी... 
मेनका म्हणाल्या, मी अशा घटनांनी फार दुःखी आहे. माझ्या मंत्रालयाने अशा विचार केला आहे की, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पॉस्को) अॅक्टमध्ये संशोधन केले जावे. म्हणजे 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल अशी तरतूद करण्याचा विचार आहे. 

 

त्याआधी, कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीबरोबर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण शुक्रवारी सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात आले. वकील पीव्ही दिनेश यांनी चीफ जस्टीस दीपक मिश्रा यांना स्वतःला या प्रकरणाची माहिती घेण्याची विनंती केली. आरोपींच्या पाठिशी असलेल्या वकिलांवर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने बार काऊंसिलला द्यावे अशी मागणीही करण्यात आली. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटले की, या प्रकरणी कोर्टाने दखल घ्यावी यासाठी काही कागदपत्रे आणि न्यूज रिपोर्ट्स दाखवा. दुसरीकडे केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी चिमुरड्यांवर अत्याचारल करण्याच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा असावी अशी मागणी केली आहे. 


अत्याचाराची दोन प्रकरणे, दोन्ही प्रकरणी देशात राग 
1) कठुआ 

8 वर्षांच्या मुलीवर 8 जणांनी केला बलात्कार, नंतर हत्याही केली  
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यामध्ये जानेवारीमध्ये 8 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला रासना गावातील एका मंदिरात बंदी बनवून अनेक दिवस तिच्यावर गँगरेप करण्यात आला. नंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. ओळखू येऊ नये म्हणून दगडाने तिचे डोके ठेसण्यात आले. अपघात वाटावा म्हणून तिचा पाठिचा कणा मोडण्यात आला. 


प्रकरण आता का आले समोर?
या प्रकरणी 4 महिन्यांनंतर आता पोलिसांनी 8 आरोपिंच्या विरोधात चार्जशीट दाखल केले आहे. मंदिराचे मुख्य सेवादार सांझीराम यांना अपहरण, अत्याचार आणि हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी म्हटले आहे. त्यांच्यासह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काही हिंदू एकता मंचशी संबंधित आहेत. 


2) उन्नाव
आमदारावर रेपचा आरोप, 10 महिन्यांनी घेतले ताब्यात 

उन्नावमध्ये एका महिलेने भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या विरोधात रेपचा आरोप लावला आहे. गेल्यावर्षी 4 जूनला तक्रार केली. पण महिलेचे असे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी तक्रार करूनही त्यावर सुनावणी झाली नाही. त्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांच्या बंगल्या बाहेर आत्महत्येचा प्रयत्नही केला. 


वडिलांच्या मृत्यूनंतर प्रकरणाची चर्चा झाली 
- पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुरुंगात कैदेत असलेल्या तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. आमदाराच्या भावावर त्यांना मारहाण केल्याचा आणि खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप होता. 
- तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला. आमदाराचा भाऊ अतुललाही अटक करण्यात आली. 
- वाढता दबाव पाहता मुख्यमंत्र्यांनी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली. शुक्रवारी सकाळी आरोपी आमदारालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


वकील म्हणाले- आम्हाला बदनाम केले जातेय 
जम्मू-काश्मीर बार असोसिएशनचे अध्यक्ष बीएस सलाथिया म्हणाले, वकिलांना बदनाम केले जात आहे. राज्यात धर्मांधपणा पसरवण्यासाठी असे केले जात आहे. आम्ही फक्त हे म्हणतोय की, खटला सीबीआयकडे सोपवा. सीबीआय धार्मिक आहे असे कोणी म्हणते का? क्राइम ब्रँचने काश्मीरमधून एक अधिकारी आणला आहे. पण इतर जबाबदार अधिकारी नाहीत का. या अधिकाऱ्यावर आधीच रेप आणि मर्डर सारखे आरोप झालेले आहेत. असा अधिकारी तपासात सहभागी असेल तर तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होईल. या प्रकरणी न्याय व्हायलाच हवा पण न्याय झाला असे वाटलेही पाहिजे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...