आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि:पक्ष सुनावणी होताना दिसली नाही तर कठुआ खटला दुसरीकडे चालवू: सर्वोच्च न्यायालय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कठुआ प्रकरणात नि:पक्ष सुनावणी होताना दिसली नाही तर हा खटला जम्मू-काश्मीरच्या न्यायालयातून बाहेर पाठवण्यात येईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर व डी.वाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले की, प्रकरणाची सुनावणी नि:पक्ष होणे गरजेचे आहे. वकिलांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाणे गरजेचे आहे. तत्पूर्वी, बार कौन्सिल ऑफ इंडियाने पीठासमोर बाजू मांडली.

 

यात कठुआत वकिल संघटनांनी आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत व पीडित कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट केले गेले. या मुद्द्यावर कोर्ट म्हणाले, वकील चुकीचे असतील तर त्यांच्यासोबत कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पुढील सुनावणी ३० जुलैला होईल. 

बातम्या आणखी आहेत...