आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दोघांचेही जवळपास सारखेच आहे. दोघांनाही भाजपला सत्तेवरून खाली खेचायचे आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांमध्ये ही समानता जरूर आहे. मात्र, एकाला यश आल्याने दुसऱ्याला अपयश स्वीकारावे लागले आहे, अशी टीका आपचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी केली आहे. राहुल गांधी यांचे अपयश हा केजरीवालांचा पराभव ठरला आहे. कारण दोघांचाही मतदार एकच असल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून केजरीवाल यांनी स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु गुजरातमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. खरे तर दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. काँग्रेस १३२ वर्षांची आहे. आपने अलीकडेच स्थापनेची पाच वर्षे साजरी केली. काँग्रेसची पाळेमुळे देशभरात पसरलेली आहेत. आप दिल्लीपुरता मर्यादित आहे. उत्तरेत काही ठिकाणी अस्तित्व दिसून येते, असे मिश्रा यांनी सांगितले. गुजरातमधील निवडणुकीत पक्षाला एका जागीही विजय मिळवता आला नाही. केजरीवालांचे २०१९ मधील निवडणुकीवर लक्ष आहे.
लोकप्रियतेत घट
गुजरातमधील विजयाचा परिणाम भाजपपेक्षा केजरीवाल आणि आपवर जास्त पडणार आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांत केजरीवाल यांची लोकप्रियतादेखील झपाट्याने घटली आहे, असे सांगून मिश्रा यांनी अमेरिकेतील पिव संशोधन केंद्राच्या पाहणीचादेखील हवाला दिला आहे. २०१५ मध्ये ६० टक्के लोक केजरीवाल यांचे समर्थन करत होते. २०१७ मध्ये मात्र त्यांच्या बाजूने केवळ ३९ टक्के लोक आहेत, असे पाहणीतून दिसून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.