आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kejriwal Writes To Modi, Asks For Help To End IAS Strike, Bjp Starts Hunger Strike

दिल्ली सरकारचे धरणे: मनीष सिसोदिया म्हणाले- एलजींनी उपोषण तोडण्याचे प्रयत्न केले तर जलत्याग करु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत आयएएस अधिकाऱ्यांचा संप. त्याविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे चार मंत्र्यांसह उपराज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत आहे.  शुक्रवारी पाचव्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आरोप केला की मोदी सरकार आणि उपराज्यपाल अनिल बैजल हे त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. सिसोदिया म्हणाले, जर त्यांनी असे केले तर आम्ही पाण्याचाही त्याग करु. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तीन दिवसांपासून भाजप आमदार उपोषणाला बसले आहेत. त्यामध्ये आपचे निलंबित कपिल मिश्रा देखील आङेत. त्यांची मागणी आहे की केजरीवालांनी कामावर परत यावे आणि दिल्लीच्या जनतेची पाण्याची समस्या दूर करावी. 

केजरीवालांचा दावा- दिल्ली सरकारच्या कामाच्या धडाक्याने केंद्र सरकारला भीती 
- केजरीवाल यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की दिल्ली सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीने केंद्राला अडचण निर्माण झाली आहे. आमच्या कामाच्या झपाट्यामुळे मोदींनी दिल्लीती आयएएस अधिकाऱ्यांना संपावर पाठवले आहे. दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टी सरकारा निवडून दिल्यापासून दिल्लीत खूप मोठे काम झाले आहे. ते पाहून लोक विचारत आहेत की दिल्लीत होऊ शकते तर मग मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये का नाही होऊ शकत. 
- केजरी म्हणाले, आम्ही दिल्लीत वीज स्वस्त केली आहे. त्यामुळे मोदींनी केजरीवाल सरकारला काम करु न देण्याचे ठरवले आहे. अन्यथा त्यांना भाजप शासित सरकारचा हिशेब द्यावा लागेल. 

- केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्र लिहून आयएएस अधिकाऱ्यांचा संप लवकर मिटवावा, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. 
- उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, आप पार्टी दिल्लीच्या विकासासाठी तपस्या करत आहे. जर उपराज्यपाल बैजल ही तपस्या भंग करणार असतील तर मी आणि सतेंद्र जैन पाण्याचा त्याग करु. 

- आप 17 जून रोजी पंतप्रधान निवासस्थावर धरणे धरणार आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...