आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ लव्ह जिहाद: हादिया-शैफिन 287 दिवसांनंतर पती-पत्नी;सुप्रीम कोर्टाने निकाल फिरवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हादियाच्या वडिलांनी मुलीचे बळजबरी धर्मांतर झाल्याचा आरोप केला होता. - Divya Marathi
हादियाच्या वडिलांनी मुलीचे बळजबरी धर्मांतर झाल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली- केरळ लव्ह जिहाद प्रकरणाने देशभरात चर्चित अालेल्या अखिला अशाेकन व शैफिन जहांचा निकाह गुरुवारी सर्वाेच्च न्यायायलाने बहाल केला. २८७ दिवसांनंतर आता दोघे पती-पत्नीप्रमाणे राहू शकतील. विवाह रद्द करणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाचा निकाल अमान्य करत सर्वाेच्च न्यायालय म्हणाले की, न्यायालयाला दोन सज्ञान व्यक्तींनी मर्जीनुसार केलेल्या विवाहात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कोणताही तिसरा पक्ष यामध्ये आडकाठी आणू शकत नाही. 

 

लग्न रद्द केले जाऊ शकत नाही. असे असले तरी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठाने स्पष्ट केले की, एनआयए विवाहाशिवाय या प्रकरणातून पुढे आलेल्या लव्ह जिहाद पॅटर्न व अन्य पैलूंचा तपास सुरू ठेवू शकते. तपास संस्था आपल्या एफआयआरनुसार हादिया व शैफिन जहांला अटकही करू शकते.  


केरळची युवती अखिला अशोकन ऊर्फ हदियाने डिसेंबर २०१६ मध्ये शैफिन जहांशी लग्न केले होते.

 

एनआयएने केरळमध्ये लव्ह जिहादच्या पॅटर्नचा अहवाल सोपवला  
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशावर एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपास संस्थेने न्यायालयास सोपवलेल्या अहवालात दावा केला होता की, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात एका धार्मिक संस्थेच्या आड ब्रेनवॉश करून धर्मांतर केले जात आहे. एका पॅटर्ननुसार मुलींचे धर्मांतर करून त्यांना सिरियात पाठवले जात आहे.  

 

वडील म्हणाले-  सर्वाेच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार  
हादियाचे वडील के.एम. अशोकन यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मुलीच्या विवाहास तडजोड ठरवत त्यांनी सुप्रीम कोर्टास पुन्हा म्हणणे समजावण्याचा प्रयत्न करू,असे सांगितले. लव्ह जिहाद पॅटर्नच्या चौकशीवर एनआयए चौकशी सुरू ठेवण्याच्या आदेशावर समाधान व्यक्त केले.

 

 

हादियाने सुप्रीम कोर्टात सांगितले- मी मुस्लिम म्हणूनच राहाणार... 
- हादियाने मागील महिन्यात सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केले होते. त्यात लिहून दिले की मी मुस्लिम आहे आणि पुढील आयुष्यात  मुस्लिम म्हणूनच राहाण्याची इच्छा आहे. शफीन जहाँसोबत लग्न झाले असून आता मी त्याची पत्नी म्हणूनच राहाणार आहे. 

 

सुप्रीम कोर्टात काय-काय झाले? 
- हादिया यांचे पती शफीन यांच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. 27 नोव्हेंबर रोजीच्या सुनावणीवेळी सिब्बल म्हणाले, की कोर्टाने राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) ऐवजी हादिया यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. त्या स्वतः येथे हजर असताना एनआयए ऐवजी त्यांचे स्वतःचे म्हणणे काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
- हादिया यांच्या वडीलांचे वकील म्हणाले होते, एनआयएने सुरुवातीचा तपास अहवाल दाखल केला आहे. तो पाहिल्यानंतरच तिचे म्हणणे कोर्टाने ऐकावे. 

 

काय आहे प्रकरण ? 
- केरळमधील अखिला अशोकन उर्फ हादियाने (25) शफीन नावाच्या मुस्लिम तरुणासोबत डिसेंबर 2016 मध्ये लग्न केले होते. मुलीचे वडील एम. अशोकरन यांनी आरोप केला की हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. त्यांच्या मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे. 
- मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखले केली होती. 25 मे रोजी हे लग्न रद्द करण्यात आले होते. हादियाला तिच्या आई-वडिलांच्या घरी पाठवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. 
- त्यानंतर शफीनने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. 

बातम्या आणखी आहेत...