आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएनएक्स प्रकरण: कार्तींच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने मागितले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अायएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या जामीन याचिकेवर सीबीअायकडून उत्तर मागितले अाहे. तसेच १६ मार्चपर्यंत या प्रकरणाचा सद्य:स्थितीचा अहवालही मागितला अाहे.


या प्रकरणाच्या सुनावणीत कार्ती यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कनिष्ठ न्यायालयातून जामीन याचिका मागे घेणार असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. या वेळी पी.चिदंबरम व त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम उपस्थित हाेत्या. कार्ती यांच्याकडून साेमवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात अाली हाेती. त्यावर पतियाळा हाऊस न्यायालयाने त्यांची २४ मार्चपर्यंत तिहार कारागृहात रवानगी केली हाेती व त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस नकार देऊन पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले हाेते. सीबीअायने २८ फेब्रुवारीला विदेशातून परतलेल्या कार्ती यांना चेन्नई येथे अटक केली हाेती. दरम्यान, यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदरमित काैर या कार्ती यांच्या याचिकेवरील सुनावणीतून बाहेर पडल्या हाेत्या व त्यांनी यामागील कारणही सांगितले नव्हते.

 

कार्तींच्या सीएला मिळाला जामीन
दिल्लीच्या विशेष न्यायालयाने कार्तींचे चार्टर्ड अकाउंटंट एस.भास्कररमण यांना दाेन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर व तेवढीच रक्कम जमा करण्याच्या अटीवर जामीन दिला अाहे. तसेच परवानगी घेतल्याशिवाय देश न साेडण्याचे अादेशही दिले अाहेत. ईडीने गत १६ फेब्रुवारीला अायएनएक्स मीडिया प्रकरणात छापासत्र राबवून भास्कररमण यांना अटक केली. यासह चाैकशीसाठी त्यांना न्यायालयीन काेठडीत ठेवले हाेते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला त्यांची कारागृहात रवानगी केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...