आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/अहमदनगर - ऑफिस ऑफ प्रॉफिट (लाभाचे पद) प्रकरणात आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. दरम्यान पक्षाचे नाराज नेते कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी कुमार विश्वास म्हणाले, आमदारांवरील कारवाईने दुःखी आहे. माझा सल्ला त्यांनी ऐकला नाही. कुमार विश्वास आज महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिंगनापूर येथे पत्रकारांनी विश्वास यांना आपच्या आमदारांवरील कारवाईबद्दल विचारले होते. शुक्रवारी निवडणूक आयोगाने
(ईसी) आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.
ऑफिस ऑफ प्रॉफिट बद्दल दिला होता सल्ला - कुमार
- विश्वास म्हणाले, 'आपच्या 20 आमदारांविरोधात झालेली कारवाई दुर्देवी आहे. मला याने फार दुःख झाले आहे. या संदर्भात मी सल्ला दिला होता, मात्र मला सांगण्यात आले की हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे. त्यामुळे मी शांत राहिलो.'
- कुमार विश्वास अहमदनगर जिल्ह्यात एका कवी संमेलनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी शनी शिंगणापूर मंदिरात पूजा केली आणि संस्थेसोबत नेत्रदानाचे शपथपत्रही भरून दिले.
- गेल्या काही दिवसांपासून कुमार विश्वास पक्षावर नाराज आहेत. त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी आप आणि नेत्यांवर उघड टीका केली होती. त्यानंतर गोपाल राय यांनी त्यांच्यावर पक्षात फूट पाडण्याचा आरोप केला होता.
'आप'चे माजी मंत्री कपिल मिश्रांचा सर्व्हे
- आप मधून निलंबित माजी मंत्री आणि आमदार कपिल मिश्रा म्हणाले, आपच्या 20 आमदारांना अरविंद केजरीवाल यांच्या स्वार्थापोटी खुर्ची गमावण्याची वेळ आली आहे.
- मिश्रा म्हणाले, 'आप'ने अंतर्गत सर्व्हे केला आहे. त्याची एक कॉपी माझ्याकडे आहे. या सर्व्हेमध्ये आप सर्व जागा गमावताना दिसत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आपचे बलाबल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.