आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकाला किंवा शहिदाला धर्म नसतो; एमआयएमचे प्रमुख ओवेसींना लष्कराचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात मोहम्मद मुजाहिद खान शहीद झाले होते. - Divya Marathi
श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात मोहम्मद मुजाहिद खान शहीद झाले होते.

जम्मू- संुजवा अतिरेकी हल्ल्यातील शहिदांच्या धर्माचा उल्लेख करणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याला लष्कराने ‘शहिदाला विशिष्ट धर्म नसतो’, असे प्रत्युत्तर दिले अाहे. नॉर्थ कमांडचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू म्हणाले, लष्कर सर्व धर्मस्थळ आहे. आम्ही सैनिक आणि त्यांच्या बलिदानाला धार्मिक रंग देत नाही. जे लोक अशी वक्तव्ये करतात त्यांना लष्कर काय आहे, हे माहीत नाही.’ दरम्यान, श्रीनगर  हल्ला उधळून लावणाऱ्या जवानाला नियम शिथिल करून पदोन्नती देण्यात येणार आहे.

 

काय म्हणाले ओवेसी 
एमआयएम प्रमुख अोवेसी मंगळवारी म्हणाले होते, ‘मुस्लिमांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणारे आता अतिरेकी हल्ल्यातील शहीद मुस्लिमांवर का गप्प आहेत? ठार झालेल्या ७ जणांपैकी ५ काश्मिरी मुस्लिम होते.

 

सुंजवां आर्मी कॅम्पमधील शहीद सैनिक
1) सुभेदार मोहम्मद अशरफ मीर 
2) हवलदार हबीबुल्लाह कुरैशी 
3) नायक मंजूर अहमद 
4) लान्स नायक मोहम्मद इकबाल 
5) सुभेदार मदन लाल चौधरी 
6) हवलदार राकेश चंद्रा
7) लान्स नायक मो. इकबाल यांचे वडील (सिव्हिलियन)

 

काय म्हणाले होते ओवेसी? 
- असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, की 'देशात प्रत्येक दिवशी मुस्लिमांना ते राष्ट्रवादी नसल्याच्या आरोपाचा सामना करावा लागतो. त्यांना पाकिस्तानात चालते व्हा, असे ऐकवले जाते. काश्मीरींवर अनेक आरोप केले जातात. आता सुंजवा आर्मी कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 7 पैकी 5 शहीद हे काश्मीरी मुस्लिम आहेत. आता मुस्लिमांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे आणि संशय घेणे बंद केले पाहिजे.'

- जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, 'लोक मारले जात आहेत. जवान शहीद होत आहेत. आणि हे दोघे (भाजप-पीडीपी) बसून मलाई खाण्यात व्यस्त आहे.'

 

मुस्लिमांचे देशासाठी इतर धर्मियांप्रमाणेच योगदान - काँग्रेस 
- काँग्रेस नेते संदीप दीक्षित बुधवारी म्हणाले, 'देशासाठी मुस्लिमांचे योगदान हे इतर धर्मियांप्रमाणेच आहे. काही पक्ष आणि संघटनांचे लोक मुस्लिमांना अँटी नॅशनल म्हणतात, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जे लोक सैन्यात आहेत त्यांना राष्ट्रवादीच मानले पाहिजे.'

बातम्या आणखी आहेत...