आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Major Wife Shailja Murder Mystery Solved, Complete Chronology Revealed By Accused Officer

मेजरच्या पत्नीने लग्नास दिला होता नकार, अधिकाऱ्याने आधी भोसकले नंतर चिरडले; असे आहे संपूर्ण प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मेजरची पत्नी शैलजा द्विवेदी मर्डर प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीतील डीसीपी विजय कुमार यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये 3 वर्षांच्या अवैध नाते संबंध समोर आले आहेत. शैलजा आणि आरोपी मेजर निखिल यांच्यात तासंतास फोन संभाषणांचा देखील पोलिसांनी उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतरच आरोपी मेजर निखिलने शैलजाचा 23 जून रोजी खून केला. मेजर अमित द्विवेदीची पत्नी शैलजा हिचा मृतदेह दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ सापडला. या प्रकरणात फॅमिली फ्रेंड आणि पतीचा सहकारी मेजर निखिलला रविवारी अटक करण्यात आली आहे.


मित्राच्या पत्नीला केले होते प्रपोज...
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शैलजा आणि मेजर निखिल एकमेकांना 2015 पासून ओळखत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. वेळोवेळी हे दोघे एकमेकांशी फोनवर गप्पा मारत होते. निखिल शैलजाचा पती मेजर अमितचा मित्र होता. हे दोघे नागालँडच्या दीमापूर येथे कार्यरत होते. निखिलने काही दिवसांपूर्वीच शैलजाकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, शैलजाने या लग्नास स्पष्ट नकार दिला. प्रस्ताव फेटाळल्यानंतरही निखिल तिच्यावर वारंवार दबाव टाकत होता. 


जखमी झाल्याचे कळताच दिल्लीला पोहोचला...
याच महिन्याच्या सुरुवातीला शैलजाच्या पायात दुखापत झाली होती. यानंतर तिला दिल्लीच्या आर्मी कॅन्ट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती निखिलला मिळाली. तेव्हा त्याने दीमापूरहून थेट दिल्ली गाठली. कथित मायग्रेनचा बहाणा करत तो सुद्धा याच रुग्णालयात दाखल झाला. त्या ठिकाणी त्याने आपल्या मुलाला सुद्धा उपचारासाठी दाखल केले होते. जो अजुनही रुग्णालयातच आहे. 


पुन्हा तोच प्रस्ताव...
शैलजासोबत अॅडमिट झाल्यानंतर त्याने शैलजाला डिस्चार्ज मिळताच स्वतःची रुग्णालयातून सुटी करून घेतली. यानंतरही तो आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्या रुग्णालयात थांबला. 23 जून रोजी (ज्या दिवशी खून झाला) निखिल रुग्णालयात होता. त्या ठिकाणी शैलजा फिजिओथेरेपीसाठी आली होती. रुग्णालयातून शैलजा आणि निखिल एकाच होंडा सिटी कारमधून बाहेर पडले. वाटेत असताना निखिलने पुन्हा तोच लग्नाचा प्रस्ताव मांडला. 


पुन्हा नकार, मग खून...
शैलजा आपल्या उत्तरावर ठाम होती. तिने पुन्हा निखिलचा प्रस्ताव फेटाळला. यावर निखिल इतका भडकला, की त्याने वेळीच आपल्या कारमध्ये ठेवलेला चाकू उचलला आणि तिच्यावर सपा-सप वार केले. गळ्यावर चाकूचे वार लागल्याने शैलजा गंभीर जखमी झाली. यानंतर निखिलने तिला कारमधून तशाच अवस्थेत बाहेर फेकले आणि पुन्हा-पुन्हा तिच्यावरून गाडी नेली. यामुळे शैलजाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली तेव्हा मेजर अमितने सुद्धा पहिला संशय निखिलवर व्यक्त केला. त्यावेळी निखिलचा फोन स्विच ऑफ होता. त्याच्या घराला सुद्धा कुलूप होते. यावरून पोलिसांचा संशय बळावला. 


असे पकडले...
हत्येनंतर निखिल दिल्लीतील साकेत येथील आपल्या घरी पोहोचला. काही वेळ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याने पुन्हा लष्करी रुग्णालयात परतण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या दिशेने निघाला परंतु, तो तेथेच चकरा लावत होता. यानंतर तो मेरठसाठी रवाना झाला. मेरठमध्ये त्याने तीन वर्षे काम केले होते. दिल्ली-मेरठ हायवेवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना त्याची कार दिसून आली. यानंतर पोलिसांचे एक पथक निखिलचा पाठलाग करण्यासाठी निघाले. पोलिसांच्या याच पथकाने 24 जून रोजी दुपारी निखिलला अटक केली. यानंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीत घेऊन आले. कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. तीच माहिती पोलिसांनी माध्यमांसमोर मांडली आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...