आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोट : महाराष्ट्र सरकार, एनआयएला नोटीस; 4 आठवड्यांत मागवले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मालेगाव स्फोटाचे आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकार व एनआयएकडून ४ आठवड्यांत उत्तर मागवले आहे. पुरोहित यांनी बेकायदशीर कारवायाविरोधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) खटला चालवण्याला आव्हान दिले आहे. 


याआधी मुंबई उच्च न्यायालयाने श्रीकांत पुरोहित आणि मालेगाव स्फोटातील इतर आरोपी समीर कुलकर्णी यांची याचिका फेटाळली होती. यूएपीए कायद्याअंतर्गत सुनावणीच्या मंजुरीसाठी अधिकृत राज्याच्या विधी व न्याय विभागाने सक्षम अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला नसल्याचा त्यांचा युक्तिवाद होता.

बातम्या आणखी आहेत...