आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरासारखेच बांधणार अयोध्या रेल्वेस्टेशन; लोक म्हणतील हीच रामजन्मभूमी- सिन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अयोध्या आणि फैजाबाद रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी केंद्र सरकार 210 कोटींचा प्रकल्प सुरु करत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी या प्रकल्पाची सुरुवात केली. हे रेल्वेस्टशन अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या धर्तीवर बांधले जाणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री सिन्हा म्हणाले. आतापर्यंत अयोध्या आणि फैजाबाद रेल्वे स्टेशनचा विकास झालेला नाही. त्याच्या विकासासाठी हजार कोटींचा प्रकल्प सुरु करण्यात येईल, असेही सिन्हा यांनी यावेळी सांगितले. 

 

जग पाहाताच म्हणले, ही रामजन्मभूमी - सिन्हा 
- अयोध्या-फैजाबाद रेल्वेस्टेशनचे काम याच महिन्यात सुरु केले जाईल असे सांगातना रेल्वे राज्यमंत्री सिन्हा म्हणाले, 'अयोध्येचा विकास अशा पद्धतीने केला जाईल की जगभरातील लोक पाहातक्षणी म्हणतील की ही रामजन्मभूमी आहे. देशाच्या प्रत्येक भागातून अयोध्येत रेल्वे आली पाहिजे असा या स्टेशनचा विकास केला जाईल.'

- देशाच्या प्रत्येक ठिकाणाहून लोक श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येतात. मात्र हे स्टेशन लोकांच्या अपेक्षेंवर खरे उतरलेले नाही. आता सरकार अयोध्या आणि फैजाबाद स्टेशनवर मोठे काम करत आहे. 

 

अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात काय झाले? 
- कोर्टाने स्पष्ट केले आहे की अयोध्या वादावर धार्मिक दृष्टीकोणातून नाही तर फक्त एका जमिनीच्या वादासारखे पाहिले जाईल. 
- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठासमोर अयोध्या वादाची सुनावणी सुरु झाल्याबरोबर याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, अयोध्या वादासोबत अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यावर चीफ जस्टीस म्हणाले,'असा युक्तीवाद चालणार नाही. आमच्या दृष्टीने हा फक्त जमीनाचा वाद आहे.'

 

अयोध्या प्रकरणात किती पक्षकार ? 
1- सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड
2- राम लला विराजमान 
3- निर्मोदी अखाडा 
या तीन पक्षकारांशिवाय कित्येक डझन पक्षकार आहेत. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी मशिद पाडली होती. 

 

अलाहाबाद हायकोर्टाने काय निर्णय दिला? 
- अयोध्या वादावर अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये वादग्रस्त 2.77 एकर जमीनीचे समान तीन भाग करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने रामलल्लाची मूर्ती असलेली जागा रामल्ला विराजमानला दिली होती. सीता रसोई आणि राम चबुतरा निर्मोही अखाडाला दिला होता, आणि तिसरा हिस्सा मशिद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्टाला देण्याचा निर्णय दिला होता. 

बातम्या आणखी आहेत...