आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यात 10 कोटींची प्रॉपर्टी घ्यायला दिला नकार, चर्चेत आहे यांचे लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दस्यू सुंदरी आणि माजी खासदार फुलन देवी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेचा गुन्हेगार शेरसिंह राणाने मंगळवारी लग्न केले. सूत्रांनुसार, राणाने मध्य प्रदेशच्या माजी आमदाराच्या मुलीबरोबर दिल्लीमध्ये लग्न केले आहे. शेरसिंह राणा सध्या जामिनावर बाहेर आहे.

 

हुंड्यात मिळत होती 10 कोटींची प्रॉपर्टी
- राणाचे लग्न छतरपूरचे माजी आमदार राणा प्रताप सिंह यांची मुलगी प्रतिमा राणाशी झाले आहे. लग्न समारंभ दिल्ली रोड स्थित एका हॉटेलमध्ये पार पडला. यात काही निवडक लोकच सामील झाले.
- सूत्रांनुसार, राणा यांना वधुपक्षाकडून हुंडा म्हणून 10 कोटींची खदान आणि 31 लाख रुपये दिले जात होते, पण त्यांनी नकार देत चांदीचे एक नाणे घेऊन लग्नविधी पूर्ण केला.

 

असे ठरले होते हे लग्न...
- प्रतिमा राणा यांची आई संध्या राजीव बुंदेला छतरपुरच्या गवारातून नगरपालिका अध्यक्ष आहेत, तर त्यांची मुलगी प्रतिमा राणाने पॉलिटिकल सायन्समधून एमए केले आहे.
- त्या म्हणाल्या की, त्या क्षत्रिय महासभेशी जोडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ग्वाल्हेरात क्षत्रिय महासभेचा एका कार्यक्रम झाला होता, यात शेरसिंह राणाही सामील झाले होते.
- कार्यक्रमात संध्या राजीव बुंदेला यांनी शेरसिंह राणा यांना पहिल्यांदा पाहिले होते. येथेच त्यांनी राणा यांना आपल्या मुलीसाठी पसंत केले होते.

 

माजी खासदार फुलन देवीच्या हत्येमुळे आले होते चर्चेत...
- तथापि, शेरसिंह राणाने 25 जुलै 2001 रोजी समाजवादी पक्षाच्या खासदार फूलन देवी यांची दिल्लीतील सरकारी निवासस्थानातून निघताना गोळ्या झाडून हत्या केली होती.
- याप्रकरणी दिल्लीच्या एका कोर्टाने 2014 मध्ये फुलन देवी हत्याकांडात दोषी ठरवत शेरसिंह राणा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच कोर्टाने शेरसिंह राणा यांना सन 2017 मध्ये जामीनही दिला होता.

 

कोण आहेत शेरसिंह राणा?
- शेरसिंह राणा यांचा जन्म 17 मे 1976 रोजी उत्तराखंडच्या रुरकीमध्ये झाला. राणाने अंतिम हिंदुसम्राट म्हणवले जाणारे पृथ्वीराज चौहान यांच्या अफगाणिस्तानच्या गजनीमध्ये ठेवलेल्या अस्थी भारतात आणल्या होत्या. यानंतर ते फूलन देवीच्या हत्येप्रकरणी तिहार जेलमध्ये बंद होते. 17 फेब्रुवारी 2004 रोजी ते जेलमधून फरार झाले आणि नेपाळ, बांगलादेश आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानात पोहोचले.
- येथे त्यांनी अफगानिस्तानच्या गजनीमध्ये ठेवलेल्या हिंदुसम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी 2005 मध्ये भारतात आणल्या.
- या पूर्ण घटनेचा राणा यांनी व्हिडिओ शूट केला. यानंतर राणाने आपल्या आईच्या मदतीने गाझियाबादच्या पिलखुआमध्ये पृथ्वीराज चौहान मंदिर बनवले, येथे त्यांच्या अस्थी आजही ठेवलेल्या आहेत.
- शेरसिंह राणा यांनी 2012 मध्ये उत्तर प्रदेशच्या जेवरमधून अपक्ष निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, शेरसिंह राणा यांच्या लग्नाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...