आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBBS डॉक्‍टर ते कट्टर धर्मप्रसारक, असा आहे वादग्रस्त झाकीर नाईक प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक पुन्हा एकदा चर्चेत आहे. झाकीरचे प्रत्यार्पण करून मलेशियाहून त्याला भारतात आणणार अशा बातम्या आज समोर आल्या. मात्र झाकीरने स्वतः हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. मला सुरक्षिततेची खात्री पटेपर्यंत भारतात येणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. झाकीरचे व्यक्तीमत्त्व नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहे. एमबीबीएस डॉक्टर ते मुस्लीम धर्मगुरू असा त्याचा प्रवास आहे. त्याच्या या प्रवासाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

 

मध्‍यववर्गीय कुटुंबात झाला जन्‍म
> डॉ. नाईकचा जन्म दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील एका मध्‍यमवर्गीय कुटुंबात 18 ऑक्‍टोबर 1965 रोजी जन्‍म झाला.
> त्‍यांचे कुटुंब मूळ कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील.
> त्‍यांचे वडील अब्‍दूल करीम नाईक हे मुंबईत आले आणि येथेच स्‍थायिक झाले.
> चार भावंडात डॉ. नाईक सर्वांत मोठे आहेत.
> लहानपणापासून ते अभ्‍यासात हुशार होते. आपल्‍या तल्‍लख बुद्धीमत्‍तेच्‍या बळावर शाळेत कायम त्‍यांचा पहिला नंबर येत असे.
> किशनचंद चेलाराम कॉलेज टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटलमधून त्‍यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.
> त्‍यानंतर डोंगरी परिसरात त्‍यांना स्‍वत:चे क्‍लीनिकसुद्धा थाटले होते.


पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉक्‍टरकी सोडून कसे झाले कट्टर धर्मप्रसारक... कोणकोणत्‍या देशात आहे बंदी... का असतात वादात... मुस्‍लीम धर्मातूनसुद्धा होतो विरोध...

 

बातम्या आणखी आहेत...