आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआप्रकरणी प्रसारमाध्यम समूहांना ठोठावला 10 लाखांचा दंड, दिल्‍ली हायकोर्टाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने कठुअा बलात्कार प्रकरणातील पीडितेची अाेळख जाहीर केल्याने बुधवारी १२ प्रसारमाध्यम समूहांना १०-१० लाखांचा दंड ठोठावला. तत्पूर्वी संबंधित प्रसारमाध्यम समूहांनी याप्रकरणी माफी मागितली. त्यापैकी नऊ समूहांचे वकील उपस्थित हाेते. याबाबतच्या कायद्याची माहिती नसल्याने व पीडितेचा मृत्यू झाला असल्याने तिचे नाव जाहीर केले जाऊ शकते या गैरसमजामुळे ही चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. 


प्रभारी सरन्यायाधीश गीता मित्तल व सरन्यायाधीश हरिशंकर यांच्या पीठाने दंडाची रक्कम एका अाठवड्याच्या अात न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे अादेश दिले. तसेच याबाबतच्या कायद्याचा व्यापक प्रमाणावर प्रचार-प्रसार करण्याचे निर्देशही दिले. याप्रकरणी दंडासह दाेन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद अाहे. ही रक्कम जम्म-काश्मीरमधील पीडितांच्या नुकसानभरपाई निधीत जमा केली जाणार अाहे. याप्रकरणी न्यायालयाने १३ एप्रिलला १२ समूहांना नाेटीस बजावली हाेती. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ एप्रिलला हाेणार अाहे.


दरम्यान, कठुअा प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्यासाठी श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी अांदाेलने करण्यात अाली. तसेच विद्यार्थिनी व नागरिकांनी श्रीनगर व उरी येथे रॅलीदेखील काढली. मात्र, अनंतनाग येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व सुरक्षा दलांशी चकमक झाली. या वेळी सुरक्षा दलांनी अश्रूधुराचे गाेळे साेडले. त्यात एक डझनपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले. यासह पुलवामा, त्राल अादी ठिकाणीही लहान-माेठ्या चकमकी झाल्या. देशातही बुधवारी काही ठिकाणी निदर्शने झाली. 

बातम्या आणखी आहेत...