आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीशांनी केली नाराज न्यायमूर्तींशी चर्चा;न्यायमूर्तींमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)

नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चार वरिष्ठ न्यायमूर्तींसोबत बैठक घेतली. ही बैठक १० ते १५ मिनिटे चालली. न्यायमूर्ती ए. के. सिकरी, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या पुढाकाराने सरन्यायाधीश आणि नाराज न्यायमूर्ती यांच्यात ही चर्चा झाली, असे म्हटले जात आहे.


न्यायालयीन कामकाज सुरू होण्याआधी झालेल्या या चर्चेच्या वेळी इतर कुठलेही न्यायमूर्ती हजर नव्हते. वाद संपला की नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, नाराज न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना काही प्रस्ताव दिले आहेत. सरन्यायाधीशांनी त्यावर विचार करून वाद सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. न्यायमूर्ती चेलमेश्वर आजारी असल्याने बुधवारी सुटीवर होते. त्यामुळे तेव्हा त्यांची सरन्यायाधीशांशी चर्चा होऊ शकली नव्हती. न्यायमूर्ती चेलमेश्वर गुरुवारी सायंकाळी चेन्नईला रवाना झाले. नाराज न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

 

 

वादाच्या वृत्तांकनावर तत्काळ बंदीची मागणी; याचिका खारिज
न्यायमूर्तींच्या वादाशी संबंधित वृत्त प्रकाशित किंवा प्रसारित करणे, या मुद्द्यावर चर्चा करणे आणि त्याला राजकीय मुद्दा करण्यावर माध्यमांना बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. खंडपीठाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार ती नोंदवून घेऊन सुनावणीसाठी यादीत जेव्हा समाविष्ट करतील तेव्हाच त्यावर विचार केला जाईल. न्यायमूर्तींच्या वादाच्या वृत्तांकनावर तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती.


पुढील स्लाइजड्सवर वाचा, सुप्रीम कोर्टाच्या या वादात आतापर्यंत काय-काय घडले.. 
 

बातम्या आणखी आहेत...