आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दिल्लीच्या अमन विहारमध्ये एका मातेवर आपल्या 8 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी महिला स्क्रिझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त आहे. आईने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाचे शिर चाकूने कापून धडावेगळे केले. एवढे करूनही मन भरले नाही तेव्हा तिने आपल्या काळजाच्या तुकड्याचे पोट फाडून त्याचे हृदय, लिव्हर आणि इतर अवयव काढून ठेवले. तिने स्वत:चे हातही चाकूने कापले आणि स्वत:चा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती तेथेच बेशुद्ध होऊन कोसळली.
पतीला दिसले भयंकर दृश्य
पतीने सांगितले मते, जेव्हा तो रात्री घरी परतला तेव्हा जमिनीवर बाळाचे शिर, बेडवर धड पडलेले दिसले. पत्नीच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. यानंतर पतीने लगोलग पोलिसांना माहिती कळवली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पती म्हणाला, पत्नीची मानसिक स्थिती ठीक नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलेवर 4 वर्षांपूर्वीही आपल्या 2 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप लागलेला आहे. त्याची अजूनही चौकशी सुरू आहे.
हत्येच्या रात्रीची पूर्ण कहाणी..
आरोपी महिला सारिकाचा नवरा हरिशंकर म्हणाला की, तो रात्री सुमारे 1.30 वाजता घरी पोहोचला. आधी बराच वेळ हरिशंकर घराच्या बाहेर उभा राहिला, पण दार उघडले नाही. मग काही वेळाने पत्नी सारिकाने दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून हरिशंकरची बोबडी वळली. बाळाचे डोके जमिनीवर आणि धड बेडवर विछिन्न अवस्थेत पडलेले होते. बाळाचे पोटही फाटलेले होते. चोहीकडे रक्त सांडलेले होते. आरोप आहे की, आईने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाचे शिर चाकूने कापून धडावेगळे केले. एवढे करूनही मन भरले नाही तेव्हा तिने आपल्या काळजाच्या तुकड्याचे पोट फाडून त्याचे हृदय, लिव्हर आणि इतर अवयव काढून ठेवले. तिने स्वत:चे हातही चाकूने कापले आणि स्वत:चा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती तेथेच बेशुद्ध होऊन कोसळली.
पतीला आधीपासूनच होती अनर्थाची भीती
पती हरिशंकर म्हणाला, त्याच्या मुलाचे नाव चिराग होते. दोन मुलीही आहेत. परंतु आईच्या भीतीने मुलींना आजोबांकडे सोडले होते. परंतु त्याला वाटले नव्हते की, सारिका आपल्या 8 महिन्यांच्या बाळाची हत्या करेल.
काय आहे स्किजोफ्रेनिया?
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डॉक्टर नितीन अग्रवाल म्हणाले की, स्किजोफ्रेनिया एक मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णाची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता प्रभावित होते. रुग्ण नेहमी उदासीन राहतो. त्याचा बाहेरच्या जगाशी संबंध संपतो. यामुळे रुग्ण आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी असमर्थ ठरतो.
4 वर्षांपूर्वीही केली होती मुलाची हत्या
हरिशंकर म्हणाला की, 4 वर्षांपूर्वी त्याला मुलगा झाला होता. तो जेव्हा एका महिन्याचा होता तेव्हाच पत्नीने त्याची गळा दाबून हत्या केली होती. त्या वेळी त्याची आई घरी होती. संध्याकाळी ती भाजी खरेदी करण्यासाठी गेली तेव्हा सारिकाने चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली. बाळाच्या गळ्यावर लाल खुणा होत्या. हरिशंकर म्हणाला की, 4 वर्षांपूर्वी जन्मलेल्या बाळाला तिने आपले दूध कधीच पाजले नव्हते. मृत चिरागलाही ती दूध पाजत नव्हती.
घटनेच्या वेळी सारिका एकटीच होती घरात
सारिका प्रेमनगर पार्ट-2 च्या जानकी विहारमध्ये राहते. कुटुंबात चिरागशिवाय पती हरिशंकर (30), दोन मुली राधिका (4) आणि राधा (अडीच वर्षे) आहेत. घटनेच्या वेळी राधिका आणि राधा शेजारी राहणाऱ्या आजोबा-आजीच्या घरी गेल्या होत्या. आठवडी बाजारात कपड्यांची दुकान लावणारा हरिशंकर गुरुवारी नांगलोईच्या बाजारात दुकान लावण्यासाठी गेला होता.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.