आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदानासाठी किमान वय 18 वर्षे आवश्यक; रक्तदाब 60 ते 100 च्या दरम्यान असणे गरजेचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रक्तदान करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदा व्यापक नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत. नव्याने लागू १०३ अटींमध्ये रक्तदानाचे किमान वय १७ ऐवजी १८ करण्यात आले. ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येणार आहे. या अटींना तांत्रिक औषधी सल्लागार मंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून यास मंजुरी मिळणे बाकी आहे. नवीन नियमांत तुरुंगातील व्यक्ती रक्तदान करू शकणार नाही.

 

पुरुष आता ९० दिवसांनंतर रक्तदान करू शकतात. पूर्वी हा कालावधी ४ महिन्यांचा होता. ज्या व्यक्तीचे हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा अधिक आहे अशीच व्यक्ती रक्तदान करू शकेल. तृतीयपंथीय, समलिंगी संबंध ठेवणारे, वारांगनांना वैद्यकीय तपासणीशिवाय रक्तदान करता येणार नाही.

 

रक्तदाब ६० ते १०० च्या दरम्यान असणे गरजेचे

- प्रसुतीच्या काळात १२ महिने, गर्भपाताच्या ६ महिन्यापर्यंत व मुल स्तनपान करत असल्यास रक्तदान करू शकणार नाहीत. 
- शस्त्रक्रियेच्या ६ महिन्यानंतर आणि रक्त चढवण्यात आले आहे अशी व्यक्ती एक वर्षानंतर रक्तदान करू शकते.

- मेलिरियाचा आजार बरा झाल्यानंतर ३ महिन्यांनी, डेंग्यू-चिकनगुनियाचे रुग्ण ६ महिने झाल्यानंतर रक्तदान करता येईल.
- स्वाइन फ्लूचा आजार बरा झाल्यानंतर १५ दिवसांनी, अँटीबायोटीक घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर रक्त देता येईल.

- इन्सूलिन घेणारे, ब्लीडींग डिसऑर्डर, एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्ण, अस्थमाचा रुग्ण, छातीत दुखणे, धाप लागणे,हृदयविकाराचा झटका आलेला असल्यास रक्तदान करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...