आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत 15 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर गँगरेप, 6 आरोपींना अटक; एक म्हणाला मी अल्पवयीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडिता मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिला खाऊ देण्याचे अमिष दाखवून 6 जणांनी दुष्कर्म केले. - Divya Marathi
पीडिता मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिला खाऊ देण्याचे अमिष दाखवून 6 जणांनी दुष्कर्म केले.

नवी दिल्ली - येथील मंडवाली भागात 15 वर्षांच्या एका दिव्यांग मुलीवर गँगरेप झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यातील एकाने स्वतःला अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशी सुरु केली आहे. 

 

डॉक्टरने केला घटनेचा खुलासा
- न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 8 जानेवारी रोजी घडली आहे. याचा खुलासा शुक्रवारी झाला. 
- मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिच्यावर लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये मेंटल स्ट्रेसचा उपचार सुरु आहे. घटना घडल्यानंतर तिने त्याबद्दल कुटुंबियांना काहीही सांगितले नाही. 
- मुलीला जेव्हा रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 
- पोलिसांनी या प्रकरणी प्रथम मुख्य आरोपी आणि त्याने दिलेल्या माहितीवरुन इतर पाच आरोपींना अटक केली आहे. 

 

पार्कमध्ये गार्डरुममध्ये केला बलात्कार 
- पोलिसांनी सांगितले, की पीडिता तिच्या घरासमोरच फिरत होती. तेव्हा एका मुलाने तिला खाण्याची वस्तू देण्याचे अमिष दाखवून पार्कमधील एका रुममध्ये नेले. तिथे त्याचे पाच मित्र होते. त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. 

बातम्या आणखी आहेत...