आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगन्नाथ पुरी मंदिरात राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नीशी गैरवर्तन, तिघांना नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिरामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्याबरोबर गैरवर्तन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी 18 मार्च रोजी दर्शनासाठी जगन्नाथ पुरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर गैरवर्तन झाले आणि सविता कोविंद यांना धक्काही मारण्यात आला होता असे समोर आले आहे. मंदिरातील काही सेवकांकडून हा प्रकार झाल्याचे समोर येत असून त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. 


या घटनेचा खुलासा मंदिर प्रशासनाच्या बैठकीचा तपशील समोर आल्यानंतर झाला आहे. पुरी जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही सुरू केली आहे. राष्ट्रपती भवनाच्या वतीने 18 मार्चच्या या प्रकारानंतर 19 मार्च रोजी पुरी येथील जिल्हाधिकाऱ्यांना मंदिरातील या प्रकाराबाबत नाराजीचे पत्र पाठवण्यात आले होते.

 

दुसऱ्याच दिवशी जगन्नाथ मंदिर प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीतील मिनट्स (तपशील) नुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्याबरोबर गैरवर्तन झाले होते. सविता कोविंद यांना धक्काही देण्यात आला होता. या प्रकरणी तीन सेवादारांना नोटीस पाठवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...