आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आश्रमातील इतरही मुलींवर दातीने केले दुष्कर्म', पीडितेने पैसे घेतल्याचा आरोप फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेने आरोप केला की दातीने पाली येथील आश्रमात अनेक मुलींसोबत दुष्कर्म केले आहे. (फाइल) - Divya Marathi
पीडितेने आरोप केला की दातीने पाली येथील आश्रमात अनेक मुलींसोबत दुष्कर्म केले आहे. (फाइल)

नवी दिल्ली/पाली - दाती महाराजवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेने आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. दाती महाराजने दिल्ली आणि राजस्थानमधील पाली येथील आश्रमातील अनेक मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितने एका षडयंत्रांतर्गत हे आरोप केले असून यासाठी पैशांची मोठी देवाण-घेवाणी झाल्याचा आरोप पीडितेने गुरुवारी फेटाळला.  

 

आश्रमातील इतरही मुली दातीच्या शिकार 
पीडितेने दावा केला आहे, की दातीने आश्रमातील इतरही मुलींवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी जर त्या मुलींचे मेडिकल केले तर सत्य समोर येईल, असे तिने म्हटले आहे. 

पीडितेने पोलिसांवरही आरोप केला. ती म्हणाली, पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासोबतच राजस्थानच्या पाली आश्रमातूनही मुली बेपत्ता आहेत, पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे असे पीडितेन म्हटले आहे. 
- पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार दोन वर्षांपूर्वी दिल्लीतील शनीधाम येथे तिच्यावर दातीने अत्याचार केला होता. मात्र समाजभयामुळे मी समोर आले नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते.

 

आज दातीची चौकशी
- दिल्ली क्राइम ब्रँचने गुरुवारी दातीचे भाऊ अशोक, अनिल आणि अर्जुनची चौकशी केली. शुक्रवारी दातीची चौकशी होणार आहे. 
- दातीने ज्या लोकांवर पैशाच्या देवाण-घेवाणीचा आरोप केला आहे त्यांचीही पोलिस चौकशी करणार आहेत. 
- दातीने बुधवारी म्हटले, की त्याच्याविरोधात रचलेल्या षडयंत्रात पीडिता फक्त एक मोहरा आहे. यामागे दुसरेच लोक असल्याचा त्याचा दावा आहे. 

 

महिला आयोगाने पाली आश्रमाची घेतली झाडाझडती 
- राजस्थान राज्य महिला आयोगाच्या सदस्य सुषमा कुमावत यांच्या नेतृत्वात 3 सदस्यीय पथकाने पाली येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील मुलींचे जबाब नोंदवून घतले. 
- दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाने क्राइम ब्रँचकडे विचारणा केली आहे की या प्रकरणात अद्याप एकही अटक का झालेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...