आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP मध्ये महिलाविरोधी विचारधारा ठासून-ठासून भरलेली: काँग्रेस, जारी केला मोदी-भागवतांचा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींनी सभागृहात काँग्रस नेत्या रेणुका चौधरींच्या हसण्यावर टीका केली होती. - Divya Marathi
पंतप्रधान मोदींनी सभागृहात काँग्रस नेत्या रेणुका चौधरींच्या हसण्यावर टीका केली होती.

नवी दिल्ली - काँग्रेसने आता भाजप आणि मोदींवर सोशल मीडियामधूनही जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्यावर मोदींनी केलेली टिप्पणी आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ काँग्रेसने जारी केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मोदी आणि भाजप नेत्यांची विचारधारा कशी महिला विरोधी आहे हे दाखवण्यात आले आहे. #MisogynisticModi या हॅशटॅगने व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर भाजपने पलटवार करताना म्हटले आहे की काही कामाचा व्हिडिओ नाही. काँग्रेसचे प्रोडक्शन बी-ग्रेडचे आहे. 

 

काँग्रेसने ट्विटमध्ये काय लिहिले? 
- नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने लिहिले आहे, 'पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे त्यांच्या मानसिकतेच उदाहरण आहे. भाजपमध्ये महिलाविरोधी विचारधारा ठासून-ठासून भरलेली आहे.'
- याआधीही मोदींवर निशाणा साधणार एक व्हिडिओ काँग्रेसने जारी केला होता. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा मोदी जागतिक नेत्यांशी कसे भेटतात, त्यांच्या हग डिप्लोमॅसीवर काँग्रेसने निशाणा साधला होता. 

 

या व्हिडिओमध्ये काय आहे? 
- काँग्रेसने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी राज्यसभेत भाषण करताना रेणुका चौधरी यांच्या हसण्यावर टिप्पणी करतात. सोनिया गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरताना दिसतात. काँग्रेस नेते शशी थरुर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांना 50 कोटींची गर्लफ्रेंड म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये आहे. 


- त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत लग्नाला कॉन्ट्रॅक्ट म्हणताना दिसतात. अरुण जेटली आणि महेश शर्मा यांचे महिलांबद्दलचे वक्तव्य यात दाखवले आहे. 
- व्हिडिओमध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे, की महिलाविरोधी विचारधारा असलेल्या नेतृत्वाकडून बरोबरीचा अधिकार कसा मिळेल? 

बातम्या आणखी आहेत...