आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास प्रस्तावावरील मतदानात बीजद- शिवसेना सहभागी नाही, तरीही मोदी सरकारकडे बहुमताचा आकडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> शिवसेनेने आधी व्हिप जारी केला होता, परंतु आता म्हटले की आम्ही मतदानात सहभागी होणार नाही.
> यूपीए आणि मोदीविरोधी पक्षांच्या एकूण जागा 137, भाजपाकडे 274 जागा

 

नवी दिल्ली -  मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताववर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. एनडीएमध्ये भाजपचा सर्वात मोठा सहकारी पक्ष शिवसेनेने (18 खासदार) यू-टर्न घेतला. एका दिवसापूर्वीच आपल्या खासदारांना व्हिप जारी केल्यानंतर शिवसेनेने शुक्रवारी सांगितले की, ते मतदानात सहभागी होणार नाहीत. दुसरीकडे, 19 खासदार असलेल्या बीजू जनता दलनेही म्हटले की, यूपीए आणि एनडीएच्या सरकारांनी काहीही केले नाही, यामुळे आम्ही बहिष्कार टाकत आहोत. या दोन्ही पक्षांनी मतदानात सहभाग न घेतल्याने लोकसभेत सदस्यांची संख्या 497 राहील. बहुमतासाठी 249 मते आवश्यक असतील. एकट्या भाजपकडे 274 खासदार आहेत.

 

लोकसभेत चर्चा सुरू
अविश्वास प्रस्तावावर चर्चेत प्रथम लोकसभेततील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला 30 मिनिटांचा अवधी मिळाला पाहिजे होता. सर्वात मोठ्या विरोधी पक्ष काँग्रेसला बोलण्यासाठी फक्त 38 मिनिटे मिळाली आहेत. 130 कोटी लोकांच्या समस्या आणि सरकारच्या चुका उजेडात आणण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे का? तथापि, स्पीकर सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले की, लोकसभेत आज संध्याकाळी 6 वाजता मतदान होईल. अविश्वास प्रस्तावावर चर्चेची सुरुवात तेदेपा खासदार जयदेव गल्ला यांनी केली. ते म्हणाले की, केंद्राने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे वचन पूर्ण केले नाही.

 
मोदी म्हणाले- देशाची नजर संसदेवर: 
चर्चेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले, ''आज आपल्या संसदीय लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस आहे. मला सहकारी खासदारांवर विश्वास आहे की, ते या निमित्ताने पुढे येऊन कुठल्याही अडथळ्याविना सकारात्मक आणि विस्तृत चर्चा पुढे नेतील. आम्ही देशाची जनता आणि संविधान निर्मात्यांचे ऋणी आहोत. पूर्ण देशाच्या नजरा आपल्यावर राहतील.''

 

सरकारने म्हटले- भूकंप काँग्रेसमध्ये येईल : 
केंद्रीय संसदीय मंत्री अनंत कुमार म्हणाले- ‘"राहुलजींनी एकदा म्हटले होते की, ते बोलल्यावर संसदेत भूकंप येईल. भूकंप नक्कीच येईल, पण तो काँग्रेसमध्ये येईल. एनडीए सरकारला अपेक्षेपेक्षा जास्त समर्थन मिळेल.’’

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, लोकसभेतील बहुमताचे गणित...  

 

बातम्या आणखी आहेत...