आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी उघड्या जीपमधून करणार दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर रोड शो, देशाच्या पहिल्या स्मार्ट हायवेचे उद्या उद्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी उघड्या जीपमधून करणार दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर रोड शो - Divya Marathi
मोदी उघड्या जीपमधून करणार दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर रोड शो

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी रविवारी उत्तर प्रदेशमधील बागपत ईस्टर्न पेरिफेरल एस्प्रेसवे (ईपीई) आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते दिल्ली ते मेरठ हायवेवर 6 किलोमीटर उघड्या जीपमधून रोड शो करतील. हा देशातील पहिला स्मार्ट आणि ग्रीन हायवे असणार आहे. 96 किलोमीटर लांबीच्या या     मार्गाच्या निर्मितीसाठी 841 कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे, हरियाणाच्या  सोनीपतमधील कुंडली येथून पलवल दरम्यानच्या ईपीईसाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मार्गाची लांबी 135 किलोमीटर आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनला उशिर होत असल्यामुळे गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने हायवे अथॉरिटीला फटकारले होते. कोर्ट म्हणाले होते, जर पंतप्रधानांकडे उद्घाटनासाठी वेळ नसेल तर 1 जूनपासून हा मार्ग सामान्यांसाठी खुला करा. 

 

निजामुद्दीन ब्रीजवरुन सुरु होणार मोदींचा रोड शो 
- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी सांगितले, की पंतप्रधानांचा रोड शो निजामुद्दीन ब्रीजवरुन सुरु होईल. दिल्ली-मेरठ मार्गावर ते उघड्या जीपमधून 6 किलोमीटर प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदी एका प्रदर्शनाचे आणि एक्स्प्रेसवेच्या 3डी मॉडेलचे उद्घाटन करतील. 
- यानंतर मोदी हेलिकॉप्टरने बागपतला रवाना होतील आणि दोन्ही महामार्ग राष्ट्राला अर्पण करतील. 

बातम्या आणखी आहेत...