आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशात होणाऱ्या सर्व निवडणुका (लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणूक) एकाचवेळी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, जे जातीय राजकारण होत आहे, ते दुर्दैवी आहे.
निवडणूक सण-उत्सवांप्रमाणे
- जवळपास एक तासांच्या मुलाखतीमध्ये मोदींनी निवडणूक, जातीय राजकारण यावर आपली मते मांडली.
- मोदी म्हणाले, निवडणूक सण-उत्सवांप्रमाणे झाली पाहिजे, विशेषतः होळी प्रमाणे. ज्या प्रमाणे आपण रंग, चिखल फेकतो आणि पुढच्या सणापर्यंत सर्वकाही विसरुन जातो.
- मोदी म्हणाले, देश नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असतो. एक निवडणूक संपत नाही तर दुसरी सुरु होते.
- 'माझे मत आहे की देशात एकाचवेळी म्हणजे, 5 वर्षांमध्ये एकदाच लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राजच्या निवडणूका झाल्या पाहिजे. एका महिन्यात या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे.'
- 'यामुळे पैसा, संसधान, मनुष्यबळ या सर्वांची बचत होईल. त्यासोबतच सेक्युरिटी फोर्स, ब्यूरोक्रॅसी आणि पॉलिटिकल मशीनरी यांना दरवर्षी निवडणुकीसाठी 100-200 दिवस इकडून तिकडे पळवावे लागणार नाही.'
पुढील स्लाइडमध्ये, मोदी मुलाखतीत काय-काय म्हणाले वाचा इन्फोग्राफिक्समध्ये....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.