आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपद्वारे मोदींचा कर्नाटक उमेदवारांसोबत संवाद, म्हणाले- जनतेची दिशाभूल करुन निवडणूक जिंकायची नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी अॅपद्वारे कर्नाटकमधील भाजप उमेदवारांशी संवाद साधला. - Divya Marathi
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी अॅपद्वारे कर्नाटकमधील भाजप उमेदवारांशी संवाद साधला.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून पंतप्रधानांनी कर्नाटकमधील भाजप उमेदवार आणि नेत्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, 'राज्यात जनतेची दिशाभूल करुन नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढायची आहे.' त्यांनी काँग्रेसवर जातिय राजकारण करत असल्याचाही आरोप केला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने काही दिवसांपूर्वीच लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. एकूण लोकसंख्येच्या 18% हा समाज आहे. राज्यातील 100 मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत आहे, त्यांच्यापुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 27 एप्रिल रोजी कर्नाटक निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहिर करणार आहेत. कर्नाटकातील 224 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी निकाल घोषित होणार आहे. 

 

विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला कोणी हरवू शकत नाही 
- भाजप उमेदवारांसोबत बोलताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यावर बोलायला घाबरतात. कारण याचे मोजमाप होते. 
- ते म्हणाले, जातीचे राजकारण करणाऱ्यांसाठी विकास हा मुद्दा नसतो. 
- मोदी म्हणाले, आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. हिच एकमेव बाब आहे ज्यामुळे आम्ही जिंकू शकतो. ही पक्षाची आणि युवकांची ताकद आहे. 


काँग्रेसवर जातिय राजकारणाचा आरोप 
- मोदी म्हणाले, जे राजकारणात जाती-धर्माचा आधार घेतात, ते निवडणुकीपुरते एका विशिष्ट समाजाला खोट्या आश्वासनांचे लॉलिपॉप देतात. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सोडून दुसऱ्यांना पकडतात. ते मतदार बदलतात आणि निवडणूक जिंकतात.'
- 'जोपर्यंत काँग्रेस कल्चरपासून मुक्ती मिळवून दिली जात नाही, तोपर्यंत राजकारणाचे शुद्धीकरण होणार नाही.'
- मोदींनी मतदारांना आवाहन केले की कर्नाटकमध्ये बहुमताचे सरकार स्थापन करा. 

- मोदी म्हणाले, 'काँग्रेसच्या शुभचिंतकांनी एक नवी चर्चा सुरु केली आहे. राज्यात त्रिशंकु विधानसभा असेल, यामुळे मतदारांना निराश केले जात आहे.' 

 

राहुल गांधी उद्यापासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर 
- काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. 
- राहुल गांधींच्या प्रचार दौऱ्यातील हा सातवा टप्पा आहे. यावेळी ते उत्तर कन्नडचा दौरा करणार आहेत. 
- काँग्रेस सूत्रांनी सांगितल्यानुसार, राहुल गांधी मंगलोरला 27 एप्रिल रोजी काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर करतील. यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. 

 

राहुल, सोनिया, मनमोहन स्टार प्रचारक 
- काँग्रेसने कर्नाटकमध्ये 40 जणांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. या यादीत राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये नसले तरी यूपीएचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. 
- शशी थरुर, सचिन पायलट, मल्लिकार्जून खरगे, गुलाम नबी आझाद, मोहम्मद अझहरुद्दीन, सिद्धारमय्या, राजबब्बर, खुशबू सुंदर, आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांच्या नावाचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...