आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाती महाराजवर दिल्लीत बलात्काराचा गुन्हा, शिष्येने केला लैंगिक शोषणाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दाती महाराजाविरोधात त्यांच्या शिष्येने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन सोमवारी दाती महाराजविरोधात दुष्कर्माचा खटला दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.  

 

कोण आहे दाती महाराज 
- दाती महाराज हे शनिधामचे संस्थापक असून विविध टीव्ही चॅनल्सवर राशिफल सांगत असतात.
- दक्षिण दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये त्यांचे कार्यालय आहे. 

 

भीतीमुळे 2 वर्षे तक्रार केली नाही 
- पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे, की दाती महाराजने 2 वर्षांपूर्वी शनिधाममध्ये तिचे लैंगिक शोषण केले. 
- समाजात बदनामी होईल या भीतीमुळे आधी तक्रार केली नसल्याचे महिलेने म्हटले आहे. 
- पोलिसांनी दाती महाराजवर कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 354 (छेडछाड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

कुठे आहे दाती महाराज 
- दाती महाराज हे दिल्लीतील फतहपूर येथील शनिधाम येथे राहातात. येथेच त्यांचे कार्यालय आहे. 

बातम्या आणखी आहेत...