आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon: कर्नाटकच्या किनारीभागात धुवाँधार, 9 तासांपासून बरसणाऱ्या पावसाने 2 जिल्ह्यात पूरस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाचे पाणी 130 बिल्डिंगमध्ये शिरले आहे. (फाइल) - Divya Marathi
कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाचे पाणी 130 बिल्डिंगमध्ये शिरले आहे. (फाइल)

नवी दिल्ली - कर्नाटकमधील किनारी भागातील मंगलोर आणि उडपी जिल्ह्यांमध्ये मंगळवारी जवळपास 9 तास पाऊस सुरु होता. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. उद्यनगर मध्ये धुवाँधार पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या भागात एका दिवसात जवळपास 34 सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये एका दिवसात 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला नाही, त्यामुळे हा विक्रमी पाऊस असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने गृह मंत्रालयाने एनडीआरएफ टीमला पाठवले आहे. 

 

संपूर्ण राज्यात रेड अलर्ट, शाळांना सुटी 
- हवामान विभागाने म्हटले आहे, की मेकुन वादळाच्या प्रभावाने हा पाऊस होत आहे. 
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...