आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनची गाडी सुसाट; गुजरात, मध्य भारत, गोव्यात सक्रिय; गुजरातमध्‍ये 29 जणांचा मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  देशभरात मान्सूनची गाडी सुसाट सुटली आहे. मान्सून गुजरात, पूर्व-मध्य भारत, गोवा व दक्षिण राज्यांत सक्रिय झाला आहे. गुजरातमध्ये त्यातही सौराष्ट्रातील काही भागात सोमवारपासून भीषण पाऊस होत आहे. गुजरातमधील सात राज्यांना पुराचा फटका बसला आहे. गीर सोमनाथ जिल्ह्यातील चार गावांत आणीबाणीसारखी स्थिती आहे. गुजरातमध्‍ये पावसामुळे चोवीस तासांत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे बचाव पथक मदतकार्यात सक्रिय झाले आहे. हवाई दलासही सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

 

येथे मुसळधार पावसाची शक्यता
चोवीस तासांत विदर्भ, दक्षिण व पश्चिम मध्य प्रदेशात जोरदार मान्सूनमुळे गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालयात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

अद्याप समाधानकारक पाऊस नाही

- वास्तविक देशभरात अद्यापही समाधानाकारक पाऊस झाला नाही.
- कारण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा, ईशान्येकडील राज्यांत मान्सून रुसून बसल्यासारखी स्थिती आहे.  
- उत्तर प्रदेशात ४५ टक्के, बिहारमध्ये ४४ टक्के, झारखंडमध्ये ४० टक्के, आसाममध्ये ४२ टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये २४ टक्के कमी पाऊस झाला आहे.

- देशातील ९१ जलाशयांत गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ११ टक्क्यांनी जास्त वाढला.

- सध्या ३२ हजार ८४७ अब्ज क्युबिक मीटर एवढा सध्या देशभरात पाणीसाठा.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, 24 तासांत सर्वाधिक पाऊस कुठे पडला...

 

 

बातम्या आणखी आहेत...