आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानीच्या मुलाचे या मुलीसोबत होऊ शकते लग्न, एकाच शाळेत शिकत होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे डिसेंबरमध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. - Divya Marathi
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे डिसेंबरमध्ये लग्न होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश याचे यावर्षी शुभमंगल होण्याची शक्यता आहे. श्लोका मेहता या तरुणीसोबत आकाश अंबानीचे दोनाचे चार हात होणार असल्याची चर्चा आहे. श्लोका ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी कन्या आहे. अंबानी आणि मेहता कुटुंबाने या नव्या नात्यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. मात्र सूत्रांची माहिती आहे की साखरपुड्याची घोषणा येत्या काही आठवड्यात होईल. वर्षाच्या शेवटी आकाश आणि श्लोकाचे लग्न होण्याची शक्यता आहे. 
 

लवकरच होणार साखरपुडा...
 - अंबानी आणि मेहता कुटुंब हे एकमेकांना चांगले परिचीत आहे. आकाश आणि श्लोका यांचे शिक्षण अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोबतच झाले आहे. यांच्या साखरपुड्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांकडून कळते.
- 26 वर्षांचा आकाश हा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या तीन मुलांमधील सर्वात मोठा मुलगा आहे. इशा त्याची जुळी बहीण आहे. तो सध्या रिलायन्स ग्रुपच्या टेलीकॉम व्हेंचर रिलायन्स जिओच्या संचालक मंडळावर आहे. 
- श्लोका जुलै 2014 पासून रोजी ब्लू फाऊंडेशनची डायरेक्टर आहे. त्यासोबतच कनेक्ट फॉर या संस्थेची सह-संस्थापक आहे. 

 

नीरव मोदीची बहीण आहे आकाशीच होणारी सासू
- हिरे व्यापारी रसेल मेहता हे रोजी ब्लू डायमंड्सचे प्रमुख आहेत. रसेल आणि मोना मेहता यांची श्लोका ही धाकटी मुलगी आहे. 
- श्लोकाची आई मोना ही पंजाब नॅशनल बँकेत 12,717 कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची नातेवाईक असल्याची माहिती आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अंबानी आणि मेहता फॅमिलीचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...