आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंड :2017 मध्ये कल वाढला, नोव्हेंबरमध्ये फंड -23 लाख कोटींपर्यंत पोहोचला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वर्ष २०१७ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरले. या दरम्यान म्युच्युअल फंड अंतर्गत संपत्ती व्यवस्थापनात सहा लाख कोटी रुपयांची वाढ झाली. या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा २३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. म्युच्युअल फंडाच्या वतीने गुंतवणूकदारांचा हा कल पुढील वर्षीदेखील कायम राहण्याची अपेक्षा आहे.  


उद्योगाच्या वतीने चालवण्यात येत असलेले जबरदस्त प्रचार अभियान आणि नोटबंदीनंतर आर्थिक उत्पादनाचे पुनरुत्थान ही या मागची प्रमुख कारणे आहेत. वर्ष २०१७ च्या अखेरपर्यंत म्युच्युअल फंड व्यवस्थापनाच्या अधीन एकूण संपत्तीच्या आधारावर ४० टक्क्यांपर्यंत वाढ राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  


नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत म्युच्युअल फंड आधार २३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला जो की डिसेंबर २०१६ मध्ये १६.४६ लाख कोटी रुपयांवर होता. म्युच्युअल फंड कंपन्यांना नवीन वर्षांतदेखील या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे, कारण सध्या देशातील खूपच कमी लोकांपर्यंत म्युच्युअल फंड पोहोचला आहे. या व्यतिरिक्त बाजार नियामक सेबीच्या  सुधारणावादी निर्णयांमुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत मिळेल. गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या नोटबंदीनंतर बँकांनी व्याजदरात कपात केली होती. त्यामुळे गुंतवणुकीला दुसरा चांगला पर्याय नसल्याने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली होती. पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायामधील व्याजदरात झालेली घट, रिअल इस्टेट आणि सोने या सारख्या इतर पर्यायांचे खराब प्रदर्शन यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ झाली असल्याचे फ्रेंकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी सांगितले.

 

छोट्या शहरातील गुंतवणूक वाढली  
देशातील सर्वात मोठ्या १५ शहरांच्या तुलनेत छोट्या शहरातील गुंतवणूकदारांची गुंतवणुकीची आकडेवारी जास्त वाढली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उद्योग जगताच्या प्रयत्नाचे हेदेखील एक मोठे यश मानावे लागेल. फंडांनी “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून ५३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा केली आहे. वर्ष  २०१७ मध्ये दर महिन्याला सरासरी ९ लाख एसआयपी खाते उघडण्यात आले असून यातून सिपचा आकार ५,८९३ कोटी झाला आहे.  

 

कंपन्यांच्या संपत्तीत ४० टक्क्यांची वाढ  
वर्ष २०१७ मध्ये एकूण सक्रिय ४२ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संपत्तीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या दरम्यान यामध्ये सरासरी २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या क्षेत्रातील संपत्तीचा आधार पहिल्यांदा मे २०१४ मध्ये १० लाख कोटी रुपयांच्या जादुई आकड्यांच्या वर गेला होता. या वर्षी नोव्हेेंबरअखेरपर्यंत हा दुपटीपेक्षा जास्तने वाढून एकूण २३ लाख कोटी रुपये झाला आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढण्याचे हे सलग पाचवे वर्ष असून त्या आधी सलग दोन वर्षी या क्षेत्रात घसरण नोंदवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...