आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोन असणे आवश्यक, 41 व्या 'मन की बात'मध्ये म्हणाले मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 41 व्या 'मन की बात' कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. 28 फेब्रुवारी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व सांगितले. आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून विचार करत वैज्ञानिक सीव्ही रमण यांनी पाण्याच्या रंगाचा शोध लावला होता. विज्ञानाला अनुसरून आपल्याला अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. 28 फेब्रुवारीलाच रमण प्रकिर्णन (स्कॅटरिंग) चा शोध लावला होता असे मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) वैशिष्ट्ये सुद्धा सांगितली आहे. 

 

जगदीशचंद्र बोसपासून थॉमस एडिसनची दिली उदाहरणे
- "आपल्याकडे अनेक वैज्ञानिक घडले आहेत. चरक, सुश्रुत जगदीश चंद्र बोस आणि सत्येंद्रनाथ बोस सुद्धा येथेच घडले. सत्येंद्रनाथ यांच्या नावे बोसोन कणांचा शोध आहे."
- "आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आयुष्य आणखी सोपे करत आहे. आता बोलता येत नसलेली व्यक्ती सुद्धा बोलू शकते. कुठलीही मशीन तशीच काम करणार जसे आपल्याला हवे आहे. आपल्यालाच फक्त ठरवावे लागेल की त्यांच्याकडून काय करून घ्यायचे आहे."
- "थॉमस एडिसन कित्येकवेळा अयशस्वी ठरले. त्यांनी सांगितले होते, की त्यांनी बल्ब बनवण्याच्या 10 हजार पद्धती शोधल्या आहेत."
- मोदी म्हणाले, 'मी अरबिंदोच्या भूमीवर आहे. त्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते. आपली पिढी विज्ञानाची सेवा करण्यासाठी प्रेरित करत राहो हीच कामना आणि त्यासाठी शुभेच्छा.'


सतर्क राहण्याचे महत्व
- पीएम मोदींनी 4 मार्च रोजी होणाऱ्या सेफ्टी डे पूर्वी अपघातांचा देखील उल्लेख आपल्या मन की बात कार्यक्रमात केला. सतर्क राहिल्याने दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात.
- मोदी म्हणाले, 'सेफ्टीवर खूप चर्चा होत असतात. सेफ्टी दोन प्रकारच्या असतात. रस्त्यातच लिहिलेले असते 'नजर हटी दुर्घटना घटी' आणि 'सुरक्षा से न करो कोई मस्ती, नहीं तो होगी जिंदगी सस्ती.'
- सतर्क राहून आपण स्वतःचा जीव तर वाचवतोच. सोबतच, इतरांना जागृक देखील करू शकतो.
- विमानात एअरहोस्टेस सुरक्षिततेच्या सूचना देतात. अनेकांनी ते ऐकले आहे. पण, त्या सूचना लागू करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही तसे करू शकत नाही. त्याचे कारणच मुळात सतर्क न राहणे आहे. आपल्यामध्ये सुरक्षिततेची भावना जागृक केल्यास इतरांनाही सुरक्षित ठेवू शकाल असे मोदी यांनी म्हटले आहे. 

 

महिलांचा उल्लेख
- 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. यात प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते. 
- महिलांची भागिदारी सुनिश्चित करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कौशल्यानंदन, कुन्तीपुत्र हीच मुलांची ओळख होती. महिलांनीच नेहमी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे. आर्थिक-सामाजिक क्षेत्रात त्यांची भागिदारी करून घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. 
- झारखंडमध्ये 15 लाख महिलांनी स्वच्छता मोहिम चालवली. ही मोठी घटना आहे. मुंबईपासून दूर एका बेटावर वसलेल्या एलिफंटा गावात 70 वर्षांनंतर वीज पोहोचली आहे. 

बातम्या आणखी आहेत...