आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या 4 वर्षानिमित्त मोदी आज ओडिशामध्ये, राहुल म्हणाले- फक्त घोषणाबाजीत पास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी आज ओडिशातील कटकमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. - Divya Marathi
मोदी आज ओडिशातील कटकमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील.

नवी दिल्ली / कटक - केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला चार वर्ष पूर्ण झाले आहेत, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशाच्या कटकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी ते सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडतील. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर         केले. ते म्हणाले, 'सरकार फक्त नारेबाजी आणि घोषणा करण्यात अव्वल ठरले आहे, बाकी सर्व क्षेत्रात फेल झाले आहे.' चार वर्षांनंतर सरकारच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ओडिशाची निवड करण्यामागे एक विशेष कारण सांगितले जात आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी वाराणसीसोबत ओडिशातील पुरी येथूनही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभेसोबत ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. यामुळे या तिन्ही राज्यांमध्ये आपला जम बसवण्याची त्यांची तयारी आहे. 

 

ओडिशातील 21 जागांपैकी फक्त एक भाजपकडे 
- ओडिशामधील कटक येथे सभा घेण्यामागे भाजपची मोठी रणनीती दिसत आहे. 2019 मध्ये ओडिशामधील जास्तीत जास्त जागा जिंकणे हे भाजपचे लक्ष्य आहे. 
- काही मीडिया रिपोर्ट्सनुसार 2019 मध्ये मोदी वाराणसीसह आणखी एक लोकसभा लढवू शकतात. त्यांची लोकसभेची दुसरी जागा ही ओडिशातील पुरी असण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये मोदींनी गुजरातमधील बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवली होती. 

 

ओडिशात लोकसभा-विधानसभा एकत्र 
- ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार आहे. त्यामुळे भाजपचे असे मत आहे की जर मोदी पुरी लोकसभा निवडणूक लढले तर भाजपला त्याचा विधानसभेतही फायदा होईल. 
- ओडिशामध्ये विधानसभेच्या 147 तर लोकसभेच्या 21 जागा आहेत. यातील 20 जागांवर बीजू जनता दल (बीजेडी) आणि एका जागेवर भाजप आहे. 
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीला 117, काँग्रेस 16 आणि भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या. 
- अमित शहांनी राज्याच्या नेतृत्वाला विधानसभेत 120+ जागांचे टार्गेट दिले आहे. 

 

मोदी म्हणाले- 2014 मध्ये बदलाला सुरुवात 
- मोदींनी सरकारला चार वर्ष झाल्यानिमित्त शनिवारी सकाळी ट्विट केले. ते म्हणाले, '2014 मध्ये आजच्याच दिवशी आम्ही भारताच्या बदलाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या प्रवासात देशातील प्रत्येक नागरिक आहे. सव्वाशे कोटी भारतीय भारताला नव्या उंचीवर घेऊन जात आहे.'

 

राहुल गांधींनी प्रसिद्ध केले रिपोर्ट कार्ड 

 

कृषि फेल
पराष्ट्र धोरण फेल
पेट्रोल-डिझेल दर  फेल
नवीन रोजगार निर्मितीमध्ये  फेल
 नारेबाजी करण्यात  A+
स्वतःचा प्रचार करण्यात  A+
योग B

सरकारने काहीच केले नाही- काँग्रेस 
- काँग्रेस आज विश्वासघात दिन देशभरात साजरा करत आहे. मोदी सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याचे काँग्रेस म्हणत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी ट्विट करून सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, 'न अच्छे दिन, न सच्चे दिन। अब आगे बढ़ेंगे तेरे बिन।' सिब्बल म्हणाले, 'जेव्हा सत्य धावते तेव्हा अच्छे दिन येत नाही. तुमचे दिवस भरले आहेत.'
- काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले, 'मोदी सरकारची चार वर्षे म्हणजे माझे भाषणच माझे प्रशासन असल्यासारखे आहे. फक्त शब्दांचे अवडंबर माजवले गेले. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरले आहे.'


मोदींचा 3 वर्षात ओडिशाचा 6वा दौरा 
- मोदींनी 1 एप्रिल 2015 मध्ये राऊरकेला येथे सभा घेतली होती. तेव्हा त्यांनी भारतीय इस्पात प्राधिकारण प्लांटचे उद्घाटन केले होते. 
- 7 फेब्रुवारी 2016 मध्ये पारादीप येथील सभेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इंडियन ऑइल रिफायनरीचे उद्घाटन केले होते. त्यासोबत पुरी येथे भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले आणि रोड शो केला होता. 
- 21 फेब्रुवारी 2016 रोजी किसान महासंमेलनात सहभागी होण्यासाठी पश्चिमी ओडिशामधील बरगडला आले होते. 
- 2 जून 2016 मध्ये बालासोरमध्ये एका सभेसाठी आले होते. 
- 15 एप्रिल 2017 रोजी भाजपची दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती, या बैठकीला मोदी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...