आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलसोबत सायबर सुरक्षा, संरक्षण, चित्रपट निर्मिती, तंत्रज्ञानासह 9 करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान  बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाले.  हे करार सायबर सुरक्षा, संरक्षण, चित्रपट निर्मिती, विज्ञान, तंत्रज्ञान याबाबत होते.  याशिवाय दोन्ही देशांमध्ये सौर ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, कृषी व जल संधारणाच्या विषयात एकत्र काम करण्यास सहमती दर्शवली. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी व नेतन्याहू  यांनी नऊ-नऊ मिनिटे केलेल्या निवेदनात उत्साह दिसला. यादरम्यान नेतन्याहू यांनी मोदींना चार वेळा आपला चांगला मित्र संबोधले तर मोदींनी नेतन्याहूंना दोन वेळा चांगला मित्र म्हटले.


 पंतप्रधान मोदींनी आपल्या निवेदनाची सुरुवात इस्रायली भाषेतील ओळींतून केली.  ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्ट अप इंडिया,संरक्षण व गुंतवणुकीवर सहमती दर्शवली.

 

संरक्षणविरहित व्यवसाय २० पट वाढला
इस्रायल- भारत द्विपक्षीय संबंध १९९२ मध्ये सुरू. तेव्हा संरक्षण क्षेत्र वगळता व्यवसाय १३०० कोटी रुपयांचा झाला होता.  संरक्षण विरहित व्यवसाय २०१७  पर्यंत २० पट वाढून वार्षिक २५ हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचला. इस्रायल भारताचा १० वा सर्वात मोठा व्यावसायिक देश आहे. २०१४ मध्ये  इस्रायलकडून  ३० हजार कोटींचे शस्त्र खरेदी केले. २०१७ मध्ये भारताने इस्रायलशी १३ हजार कोटींचा लष्करी करार केला .

 

 

 भारताच्या विरोधाचा परिणाम नाही
 नेतन्याहू यांनी भारत-इस्रायल संबंधास “स्वर्गात जमलेली जोडी’ असल्याचे सांगत म्हटले की, संयुक्त राष्ट्रात जेरुसलेम मुद्द्यावर भारताने इस्रायलविरुद्ध मत दिल्याने त्यांच्या देशाची निराशा झाली. मात्र, यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर फरक पडणार नाही. नेतन्याहू म्हणाले, नैसर्गिकरित्या आम्ही निराश झालो. मात्र,आमच्यातील संबंध अनेक आघाडीवर पुढे जात आहेत हे या यात्रेतून दिसते.

 

वर्ल्ड मीडिया; रद्द झालेला ३.२ हजार काेटींचा करार पुन्हा हाेऊ शकताे

 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासाेबत नात्याच्या एका नव्या पर्वाला प्रारंभ केला अाहे. भारताने नुकताच रद्द केलेला ३.२ हजार काेटींचा संरक्षण करार या दाैऱ्यामुळे पुन्हा हाेऊ शकताे. या वेळी नेतन्याहू व माेदी यांच्यात गाढ मैत्रीची झलकही दिसली. दाेघांनी अनेकदा एकमेकांना ‘मित्र’ संबोधले.  


द नेशन। इस्रायलचे पंतप्रधान भारत दाैऱ्यावर अाहेत. ते १२५हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींसह भारताच्या दाैऱ्यावर गेले अाहेत. त्यांनी भारताने युनोत जेरूसलेमला राजधानीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाविराेधात मत दिल्याने नाराजी व्यक्त केली.


बीबीसी। गतवर्षी पंतप्रधान माेदींनी इस्रायल दाैऱ्यात तेथील नागरिकांच्या मनावर ठसा उमटवला हाेता. मात्र, डिसेंबर २०१७मध्ये संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे जेव्हा जेरूसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देणारा प्रस्ताव घेऊन अाले असता, भारताने याविराेधात मत टाकले. यामुळे इस्रायली नागरिक नाराज अाहेत.

 


दोन्ही देशांदरम्यान नवा अध्याय सुरु 
- संयुक्त पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी म्हणाले, 'नेतन्याहू यांचे भारतात स्वागत आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या दौऱ्याने दोन्ही देशांदरम्यान नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.'
- मोदी म्हणाले, 'दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या दरम्यान सायबर को-ऑपरेशन, विज्ञान-तंत्रज्ञान, फिल्म को-ऑपरेशन, होमियोपॅथी आणि अल्टरनेटीव्ही मेडिसीन यांच्यासह 9 करार झाले.'
- 'आज आणि उद्या आम्ही दोन्ही देशांचे संबंध पुढे कसे नेता येतील यावर चर्चा करणार आहोत. यातून नव्या संधी आणि नवे मार्ग सापडतील.'
- मोदी म्हणाले, गेल्या वर्षी जुलैमध्ये मी सव्वाशे कोटी भारतायांच्या शुभेच्छा घेऊन इस्त्रायल दौऱ्यावर गेलो होतो. तेथून माझे मित्र बीबी (नेतन्याहू) आणि इस्त्रायल नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन परत आलो.
- आम्ही यापुढे लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत क्षेत्रावर कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण यातील सहकार्याला प्रोत्साहन देणार आहोत. 
- संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही इस्त्रायलच्या कंपनीला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. एफडीआयमध्ये दिलेल्या सवलतीचा त्यांनी फायदा घ्यावा आणि भारतीय कंपन्यांसोबत काम करावे, असे मोदी म्हणाले. 

 

'मोदींनी भारतात क्रांती आणण्याचे काम केले'
- नेतन्याहू म्हणाले, 'मोदी हे क्रांतिकारी नेते आहेत. त्यांनी भारतामध्ये क्रांती आणण्याचे काम केले आहे. त्यांनी देशाच्या भविष्याचा विचार केला आहे. मोदींचा इस्त्रायल दौरा अभूतपूर्व होता. भारताच्या एखाद्या पंतप्रधानांनी इस्त्रायल दौरा करण्याची ती पहिली वेळ होती. तुम्ही आमच्या देशात आले त्यासाठी धन्यवाद.'
- 'इतर देशात राहाणाऱ्या यहुदी नागरिकांप्रमाणे भारतातील यहुदींना कधीही दुजाभावाचा अनुभव आला नाही. यासाठी भारतीय संस्कृती, सभ्यता, उदारमतवाद आणि लोकशाहीला सलाम.' 
- मोदींच्या भाषणांचे कौतूक करताना नेतन्याहू म्हणाले, 'पंतप्रधान मोदींची इस्त्रायल भेट उत्साहाने भरलेली होती. त्यांच्या दौऱ्याने भारतीय वंशांच्या इस्त्रायल नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता. त्यांचे भाषण मला एखाद्या रॉक कॉन्सर्टप्रमाणे वाटत होते. ती एक ऐतिहासिक घटना होती.'

 

काय म्हणाले नेतन्याहू 

 

दोन्ही देशांच्या मजबूत संबंधांची सुरुवात मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यापासून... 

- सोमवारी नेतन्याहू म्हणाले, दोन्ही देशांच्या मजबुत संबंधांची सुरुवात मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यापासून झाली आहे. त्या दौऱ्याने उभय देशांमध्ये उत्साह निर्माण केला होता, जो आजच्या माझ्या दौऱ्यापर्यंत कायम आहे. 

- भारत आणि इस्त्रायलची ही मैत्री नव्या युगाची सुरुवात आहे. 


या 5 कारणांमुळे नेतन्याहूंचा भारत दौरा महत्त्वाचा 
1 - 15 वर्षांनंतर भारतात येणारे इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान आहेत  बेंजामिन नेतन्याहू . याआधी 2003 मध्ये पंतप्रधान एरियल शेरॉन भारतात आले होते. 
- नेतन्याहू यांचा दौरा भारत-इस्त्रायल मैत्रीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण यूएनमध्ये भारताने येरुशेलम राजधानी घोषित करण्याविरोधात मतदान केले होते. 

2 - 3181 कोटींची अँटी मिसाइल डील होऊ शकते 
- काही दिवसांपूर्वी भारत आणि इस्त्रायल यांच्यात 3181 कोटी रुपयांची अँटी टँक स्पाइक मिसाइल डील आणि राफेल वेपन्स डील रद्द झाली होती.
- आशा आहे की नेतन्याहू आणि मोदी यांच्यात या डीलवर पुन्हा चर्चा होऊन करार केला जाईल. या कारारानुसार इस्त्रायल भारताला 8000 अँटी टँक स्पाइक मिसाइल देईल. 
- या दौऱ्यात भारत-इस्त्रायल दरम्यान 445 कोटी रुपयांच्या जमीनीवरुन आकाशात मारा करणाऱ्या 131 क्षेपणास्त्रांसह इतर करार होतील. 

 

3 - पाक सीमेवर स्मार्ट संरक्षण 

- भारताने पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानलगतच्या सीमेवर स्मार्ट संरक्षण (बाड लावणे) करण्याचा निर्णय घेतला होता. इस्त्रायल भारताला स्मार्ट बाडचे तंत्रज्ञान देणार आहे. 
- इस्त्रायलने अरब देशांच्या सीमेलगत 200 किलोमीटर अशी स्मार्ट बाड लावली आहे. 

4 - भारत - इस्त्रायल संबंधांचा रोप्यमहोत्सव 
- 2017 मध्ये भारत-इस्त्रायल संबंधांना 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशांनी हा रोप्यमहोत्सव साजरा केला. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी इस्त्रायलला गेले होते. इस्त्रायल दौऱ्यावर जाणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले होते. 
- नेतन्याहू यांचा दौराही ही मैत्री केंद्रस्थानी ठेवूनच आखलेला आहे. 1999 मध्ये ही मैत्री अधिक दृढ झाली होती. कारगिल युद्धावेळी इस्त्रायलने भारताच्या एका मागणीवर लेजर गायडेड बॉम्ब आणि मानवरहीत प्लेन उपलब्ध करुन दिले होते. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दारु-गोळाही दिला होता. 

 

5 - भारत दरवर्षी करतो इस्त्रायलकडून 6400 कोटींचे शस्त्र खरेदी 
- उभय देशांमध्ये कृषी, संरक्षण, सायबर सेक्यूरिटी, औषधी, सिनेमा, जल, फुड इंडस्ट्री, विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे.
- भारत आणि इस्त्रायल यांच्यात दरवर्षी 25,452 कोटी रुपयांचे करार होतात. भारत दरवर्षी साधारण 6400 कोटी रुपयांची शस्त्र खरेदी करत असतो. 

 

लग्नाच्या गाठी तर स्वर्गात बांधल्या जातात... 
 -  अमेरिकेने येरुशलेमला इस्त्रायलची राजधानी घोषित करण्याच्या निर्णयाला भारताने यूएनमध्ये विरोध केला होता. यामुळे इस्त्रायल नाराज होता. त्यावर नेतन्याहू म्हणाले, एका मताने आमच्या मैत्रीवर, संबंधांवर परिणाम होऊ शकत नाही. यूएनमध्ये भारतासह 127 देशांनी त्याविरोधात मतदान केले होते. 
 - महत्त्वाची बाब ही आहे की दोन्ही देश, दोन्ही देशांचे नागरिक आणि नेते यांच्यातील संबंध चांगले आहेत. भारत-इस्त्रायलच्या मैत्रीला तुम्ही, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात मात्र त्यावर शिक्कामोर्तब धरतीवर होतो, असेही म्हणू शकता. 
- मोदी एक महान नेते आहेत. आपल्या नागरिकांचे भविष्य सुधरवण्यासाठी ते अधिक उत्साही आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींनी प्रोटोकॉल मोडून केले स्वागत...

बातम्या आणखी आहेत...