आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्टाचार मोडत नरेंद्र मोदी पोहोचले अटलजींच्या भेटीला, प्रत्येक सिग्नलवर थांबला PM चा ताफा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री अचानक एम्सला पोहोचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्टाचर मोडत ही भेट घेतली. त्यांनी एम्स प्रशासनालाही भेटीची कल्पना दिली नव्हती. पंतप्रधान निवासस्थान सात लोक कल्याण मार्ग येथून एम्स पर्यंत प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर मोदींचा ताफा थांबला होता. 

 

वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले, की रविवारी रात्री 9 वाजता मोदी एम्समध्ये पोहोचले. जवळपास 20 मिनिट ते तिथे होते. 93 वर्षांच्या अटलजींना 11 जून रोजी एम्समध्ये दाखल केले होते. त्यांना डायबिटीज आहे. त्यांची फक्त एक किडनी काम करत आहे. यावेळी मुत्रमार्गात झालेल्या इन्फेक्शनमुळे त्यांना एम्समध्ये दाखल केले होते. डॉ. रणदीप गुलेरिया हे अटलजींवर उपचार करत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते अटलजींचे खासगी फिजिशियन आहेत. 

बातम्या आणखी आहेत...