आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Indonesia Singapore 5 Day Visit Defence Trade Assistance News And Updates

PM मोदी आजपासून 5 दिवसाच्या इंडोनेशिया-सिंगापूर दौ-यावर, चीनच्या घेराबंदीचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (29 मे) सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या 5 दिवसाच्या दौ-यावर जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान या दौ-यात दोन्ही देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. यात संरक्षण खात्यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचे करार होतील. मोदींचा इंडोनेशियाचा हा पहिला दौरा असेल तर सिंगापूरचा दुसरा   दौरा आहे. मोदी यांच्या या दौ-याबाबत दिव्यमराठीने परराष्ट्र धोरणांचे अभ्यासर रहीस सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या माहितीनुसार, मोदी यांचा या देशांच्या दौ-याचा उद्देश हाच आहे की, चीनची घेराबंदी करणे. दुसरीकडे, भारत या दौ-यात व्यवसाय वृद्धी व संरक्षण क्षेत्राशी संबंधित फायदा होईल.

 

मोदींचा हा दौरा एक्ट ईस्ट पॉलिसीनुसार-

 

- रहीस सिंह यांच्या माहितीनुसार, "2015 मध्ये सिंगापूरमध्येच एक्ट ईस्ट पॉलिसीची घोषणा झाली होती. 1991 मध्ये लुक ईस्ट पॉलिसीची घोषणा झाली होती. लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडील देशांची संस्कृती-सभ्यता, त्यांची सुरक्षा पाहणे आणि त्यांच्याशी जवळिक ठेवणे. कारण जग फार वेगाने बदलत आहे. त्यामुळेच आपण एक्ट ईस्ट पॉलिसीवर येऊन पोहचलो. जेणेकरून पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांसोबत उत्तम संबंध राहावेत."

 

इंडोनेशिया महत्त्वाचा का?

 

- "खरं तर चीनचा एक न्यू मेरीटाईम सिल्क रूट आहे, जो इंडोनेशियातील मलक्का हून अफ्रिकेतील जिबूतीपर्यंत जातो. एक प्रकारे हा रूट भारताला घेरतो.

 

- भारत इंडोनेशियासोबत अशा प्रकारचा समझोता करायला जात आहे जेथे दोन देशांदरम्यान व्यापार व संरक्षण भागीदारी होईल. जर इंडोनेशियाचे भारताशी चांगला ताळमेळ राहिला तर आपण चीनच्या मेरीटाईम सिल्क रूटला काउंटर करू शकू.

 

- चीनची नजर सध्या पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि म्यानमार-फिलीपाईन्स देशावर आहे. जर आपल्यासोबत इंडोनेशिया आला तर आपण अंदमान-निकोबारजवळ चीनची वाढणारी वर्दळ रोखू शकतो.
 
- इंडोनेशिया, दक्षिण-पूर्व आशियातील उभरती आर्थिक शक्ती आहे. सध्य स्थितीत भारत सुद्धा एक जागतिक ताकद म्हणून पुढे येत आहे. जर आपण इंडोनेशियासोबत धोरणात्मक संबंध जोपासले तर  चीनच्या कूटनीतिक सौदेबाजीच्या वेळी भारत पॉजिटिव साईडमध्ये राहील.

 

चीनसमोर सिंगापूरचे आव्हान-

 

- "सिंगापुर एक मोठा उत्पादक देश म्हणून पुढे आला आहे. पूर्व आशियात जर चीनच्या समोर कोणाचे आव्हान असेल तर ते सिंगापूरचे आहे."


- "चीनी मालावर बहिष्काराची चर्चा होते. मात्र, भारत डब्ल्यूटीओ नॉर्ममुळे असे करू शकत नाही. दूसरीकडे, भारताला अशा काही वस्तू मागवाव्याच लागतात मग त्या चीनवरून मागवू अथवा सिंगापूरवरून. दुसरीकडून वस्तू मागवल्या तर त्याच्या किंमती जास्त असू शकतात. याचा आपल्या व्यापारावर नकारात्मक परिणाम होईल."

 

सिंगापूरपासून भारताला अनेक फायदे-

 

- सिंगापूर दौ-यामुळे भारताचे त्यांच्याशी व्यापारी संबंध मजबूत होतील.
 

-आशिया-प्रशांत क्षेत्रत भारतासोबत जापान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देश आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या सध्याच्या अस्थिर विदेश नीतीमुळे आपल्याला प्रशांत क्षेत्रात अन्य सहकारी देशाची गरज आहे. अशावेळी भारताने जर सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, लाओस, मलेशिया आदी देशांना आपल्या बाजूने झुकवू शकला तर भारत मेरीटाईम सिक्युरिटी आणि ब्लू वॉटर इकोनॉमीला जास्तीत जास्त अॅक्सेस करू शकेल.

बातम्या आणखी आहेत...