आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींचा मुद्रा लाभार्थ्यांशी संवाद, नाशिकच्या हरीभाऊंना म्हणाले, कर्जाची परतफेड वेळेवर करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी नमो अॅप द्वारे पंतप्रधान मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. दूरदर्शनवर सकाळी 9.30 वाजता या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

 

यावेळी संवाद साधताना मोदी म्हणाले, आपण स्वातंत्र्यानंतर देशात लायसन्स राज पाहत आलो आहे. कर्ज त्यांनाच मिळायचे जे बडे लोक असत.   ज्यांचे नाव समाजात असायचे त्यांचीच शिफारस केली जायची. त्यामुळे गरीब व सामान्य माणूस या सिस्टिमच्या बाहेर उभा होता. त्यामुळे त्याला केवळ पैशांअभावी आपल्या कामाचा, उद्योगाचा विस्तार करू शकले नाहीत. प्रत्येक छोठा-मोठा व्यक्ती काहींना काही करू इच्छितो. मात्र, सुरूवातीलाच तो सावकारांच्या पाशांत अडकतो. मग पुढे त्याला सर्व काही गहाण ठेवण्याची वेळ येते. मुद्रा योजनेमुळे सावकारी करणा-या लोकांच्या विळख्यातून देशातील तरूणांची सुटका झाली आहे. 

 

पंतप्रधान मोदी एक दिवसापूर्वीच उज्ज्वला योजनेचा लाभ घेणा-या देशभरातील महिलांशी संवाद साधला होता. 

 

नाशिकच्या हरिभाऊ यांच्याशी मराठीशी संवाद-

 

नाशिकचे हरिभाऊ यांच्यासोबत मोदींनी थेट संवाद साधला. त्यांचे नाव घेऊन मोदींनी त्यांना तुमचा अनुभव सर्वांना     सांगा   याची विनंती केली. मोदींनी हरिभाऊंसोबत मराठीत संवाद साधला, ते म्हणाले, बोला हरिभाऊ... हरिभाऊ यांनी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग उभा केला. पंतप्रधानांनी त्यांना विचारले की तुम्ही किती लोकांना रोजगार देता, त्यावर हरिभाऊंनी सांगितले की त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून तीन जणांना रोजगार मिळाला आहे. बँकेची परतफेड वेळेवर करा असेही मोदींनी त्यांना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...