आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींनी शेअर केला स्वतःचा फिटनेस व्हिडिओ, CM कुमारस्वामींना केले नॉमिनेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटच्या चॅलेंजवर मोदींनी फिटनेस व्हिडिओ शेअर केला. - Divya Marathi
विराटच्या चॅलेंजवर मोदींनी फिटनेस व्हिडिओ शेअर केला.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोट कोहलीच्या चॅलेंजवर स्वतःचा फिटनेस व्हिडिओ शेअर केला. त्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राला चॅलेंज दिले आहे. त्यासोबतच त्यांनी भारतीय पोलिस सेवेतील 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अधिकाऱ्यांनाही नॉमिनेट केले आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यायाम, योग आणि रनिंग करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंजची सुरुवात क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केली होती. फिटनेससाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी ट्विटरवर मोहिम चालवली होती. या मोहिमेत त्यांनी स्पोर्ट्स आणि बॉलिवड जगतातील लोकांना सहभागी करुन घेतले होते. राज्यवर्धन राठोड यांच्या या फिटनेस चॅलेंजवर विरोधकांनी टिकाही केली होती. 

 

फिटनेस व्हिडिओमध्ये पाच तत्वांचा उल्लेख 
- 'हम फिट तो इंडिया फिट' या मोहिमेंतर्गत मोदींनी एक मिनिट 48 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 
- त्यांनी लिहिले आहे की माझा वॉक पंच तत्वावर - पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश याने प्रेरित आहे. 

 

मोदींनी विराटच्या चॅलेंजवर म्हटले होते- मंजूर आहे 
- राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावर फिटनेस व्हिडिओ पोस्ट करुन विराट कोहलीला चॅलेंज दिले होते. त्यानंतर विराटने 24 मे रोजी पंतप्रधान मोदी, अनुष्का शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. मोदींनी विराटचे चॅलेंज स्वीकारत लिहिले होते, की लवकरच फिटनेस व्हिडिओ शेअर करणार. 

 

कुमारस्वामींनी म्हटले, माझ्या प्रकृतीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद 
- कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मोदींच्या चॅलेंजला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'पंतप्रधानांनी माझ्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली त्यासाठी त्यांचे धन्यवाद. यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. फिजिकल फिटनेस सर्वांसाठी आवश्यक आहे. मी योग आणि ट्रेडमिल वर्कआऊट करत असतो. मात्र माझ्या राज्यातील विकासाची मला चिंता आहे. त्यासाठी तुमचे सहकार्य आपेक्षित आहे.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींचा फिटनेस व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...