आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वाशे कोटी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प, जेटलींच्या टीमला शुभेच्छा : नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटलींनी गुरुवारी मोदी सरकारचे अखेरचे पूर्ण बजेट सादर केले. त्यासाठी नरेंद्र मोदींनी जेटली आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. न्यू इंडियाचा पाया सशक्त करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मोदी म्हणाले. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गरीबांसाठी आरोग्य म्हणजेच हेल्थ योजना आहे आणि संपत्ती म्हणजे वेल्थ वाढवण्याची योजनाही आहे. सर्वांसाठीच काहीतरी आहे. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे बजेट आहे. 


नरेंद्र मोदी म्हणाले, हा शेतकरी आणि व्यावसायिक दोघांचाही अर्थसंकल्प आहे. ईज ऑफ डुइंग बिझनेससाठीचा अर्थसंकल्प आहे. चांगल्या आरोग्याचे आश्वासन देणारा अर्थसंकल्प आहे. आपल्या देशात शेतकऱ्यांनी खाद्यान्न आणि फळे-भाज्या यांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यासाठी अनेक पावले या अर्थसंकल्पात आहेत. त्यांच्यासाठी साडे 14 लाखा कोटींची तरतूद आहे. 2 कोटी शौचालये तयार केली जातील. त्याचा थेट लाभ दलित, पीडित, शोषीत आणि वंचितांना मिळेल. 


त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही मिळतील. शेतकऱ्यांना खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव मिळेल. यासाठी आम्ही राज्यांशी चर्चा करणार आहोत. फळे आणि भाज्यांसाठी ऑपरेशन ग्रीन राबवले जाईल. अमूलने दूध क्षेत्रात नवा आदर्श रचला. उद्योगाच्या विकासासाठी क्लस्टर बेस प्रोग्राम चालवला जाईल. 


आता आम्ही कृषी क्लस्टर योजना चालवू. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या उत्पादनांसाठी स्टोरेज आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सहकारी संस्थांना प्राप्तीकरातून सूट मिळेल. एफपीओ वाढत आहे. त्यांना आधी लाभ मिळत नव्हता. आता त्यांनाही लाभ मिळेल. 

 

बातम्या आणखी आहेत...