आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर नरेंद्र मोदी यांचे 60% फॉलोअर्स बोगस!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा - डिजिटल डिप्लोमसीवर नजर ठेवून वास्तव मांडणाऱ्या जिनेव्हातील ट्विप्लोमसी या संस्थेनुसार, नरेंद्र मोदी यांचे ६०% फॉलोअर्स बोगस आहेत. मोदींनंतर दुसरा क्रमांक पोप फ्रान्सिस (५९%) यांचा असून तिसऱ्या क्रमांकावर असलेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ३७% फॉलोअर्स बोगस आहेत.

 

ट्विप्लोमसीने नवे ग्राफिक्स २१ फेब्रुवारीला ट्विट केले होते. त्यांची जोरदार चर्चा आहे. ट्विप्लोमसीनेच २०१७ मध्ये एका ब्लॉगमध्ये ट्विटरवर ४.१ कोटी लोक ज्यांना फॉलो करतात ते पंतप्रधान मोदी जगातील तिसरे सर्वात शक्तिवान नेते असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ट्विप्लोमसीच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांना शंका आहे.

 

विशेष म्हणजे पीएमओचे ट्विटर अकाऊंटही ट्विप्लोमसीला फॉलो करते. तामिळनाडू काँग्रेस समितीने ट्विप्लोमसीचे इन्फोग्राफिक्स वापरून म्हटले आहे की, ‘ट्विटरवर बोगस फॉलोअर्समध्येही मोदीजी जगात अव्वल स्थानी आहेत.’

बातम्या आणखी आहेत...