आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा पर चर्चा : प्रधानमंत्री मोदी के साथ; मोदींनी दिल्या टिप्स, म्‍हणाले जे आवडते तेच करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी विद्यार्थ्यंना सकारात्मकता अंगी बानवण्याचा संदेश दिला. - Divya Marathi
मोदींनी विद्यार्थ्यंना सकारात्मकता अंगी बानवण्याचा संदेश दिला.

नवी दिल्ली- आपल्या एक्झाम वाॅरियर्स पुस्तकाच्या माध्यमातून परीक्षांची तयारी व तणावापासून दूर राहण्याच्या टिप्स देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी-बारावीच्या परीक्षेआधी झालेल्या ‘परीक्षा पर चर्चा : प्रधानमंत्री मोदी के साथ’ हा कार्यक्रम तालकटोरा स्टेडियममधील लोकांसह देशभरातील १० कोटीपेक्षा जास्त मुले, त्यांचे कुटुंबीय व शिक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाहिला. सुरुवातीला मोदी म्हणाले, विसरून जा की तुम्ही पंतप्रधानांशी बोलत आहात. मी तुमचा मित्र आहे. मोदींनी या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली.

 

जे आवडते तेच करा : मोदी
- परीक्षेआधी टीव्ही-गप्पा बंद... हे योग्य नाही. जे चांगले वाटते ते करा. गुणांच्या मागे धावू नका. इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी आधी स्वत:शीच स्पर्धा करा.
- फोकस करायचा असेल तर आधी -डी फोकस होणे शिका. रिकाम्या भांड्यातच दूध ओतता येईल. २४ तास परीक्षा आणि प्रॅक्टिकलच्या विचारांत गुरफटू नका.

 

भारतीय मुलं हे जन्मजात राजकारणी

- पालकांची मुलांकडून मोठी अपेक्षा असते, ते विसरुन जातात की प्रत्येकाच्या वेगळ्या क्षमता असतात. तुम्ही आमच्या पालकांना याबद्दल सांगू शकता. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला. लेहमधील महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही हाच प्रश्न विचारला. 
- अनेक आई-वडीलांचे स्वप्न असते जे मी होऊ शकलो नाही, ते माझ्या मुलाने-मुलीने व्हावे. मी डॉक्टर होऊ शकलो नाही तर माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावे असे त्यांचे स्वप्न असते. हे तणावाचे वातावरण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. यासाठी मुलांनी आई-वडिलांसोबत संवाद साधला पाहिजे. त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा त्यांच्याकडे हा विषय छेडला पाहिजे. 
माझे तर मत आहे की भारतीय मुलं हे जन्मजात राजकारणी असतात. कारण आपण संयुक्त कुटुंबात राहात असतो. आपले काम अडल्यानंतर आपण आजीच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून वडिलांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्याकडून होकार मिळवतोच. 

- आई-वडिलांनीही विचार केला पाहिजे की मुल एका परीक्षेत अपयशी झाले तर आयुष्य संपलेले नसते. यासाठी मोदींनी देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचे उदाहरण दिले. कलामांना फायटर प्लेन पायलट होण्याची इच्छा होती. मात्र ते होऊ शकले नाही. म्हणून आयुष्य संपले का? उलट देशाला एक मोठा शास्त्रज्ञ मिळाला. 
- तेव्हा पालकांनी मुलांचा कल ओळखून त्यांना मदत केली पाहिजे. एका परीक्षेने मुलांचे मुल्यमापन करु नका. 

 

स्वतःशी स्पर्धा करा...

- स्वतःला ओळखले पाहिजे. तुमच्यात काय आहे हे पहिले जाणून घ्या. यासाठी तुमच्या मित्रांची मदत घ्या. 
- प्रतिस्पर्धा कराल तर एक प्रकारचा तणाव येतो. त्यासाठी कोणाशी स्पर्धा करु नका. तर स्वतःशी स्पर्धा करा. लोक तुमच्यासोबत स्पर्धा करतील अशी स्थिती निर्माण करा. 
- आज तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल तर 3 तास वेळ द्या.  

 

फोकस करण्यासोबतच डि-फोकस झाले पाहिजे

- फोकस करण्यासोबतच डि-फोकस करणेही शिकले पाहिजे. 24 तास परीक्षा, करिअर यांचा विचार करु नका. याच्याही पलिकडे जग आहे. त्यासाठी खेळले पाहिजे. 
- आपण पंचमहाभूतांच्या संपर्कात आले पाहिजे. पाणी, जमीन, हवा यांच्या संपर्कात गेले पाहिजे. कधी चप्पल-बूट न घातला चालले पाहिजे. 
- परीक्षा आहे म्हणून मित्र बंद, खेळणे बंद. छंद बंद. अमिताभ बच्चन असते तर ते म्हणाले असते दरवाजा बंद. टीव्ही बंद, गाणे ऐकणे- गाणे बंद. ऐवढे सर्व करण्याची गरज नाही. परीक्षेवर फोकस करतानाच डी-फोकस होत तुम्ही या सर्व गोष्टींसाठीही वेळ दिला पाहिजे.

- मोदींनी यासाठी स्वतःचे उदाहरण दिले. मी जेव्हा एखाद्या सभा-संमेलनात असतो तेव्हा काहीवेळा माझा चेहरा तणावग्रस्त दिसतो. तेव्हा मी माझ्या विचारांमध्ये एकाग्र झालेलो असतो. परंतू जेव्हा शेजारी बसलेल्यांसोबत बोलायला लागतो तेव्हा मी रिलॅक्स होतो.  

 

शेवटचा प्रश्न मोदींच्या परीक्षेवर...

- विद्यार्थी गिरीश सिंहने प्रश्न केला की मी 11 वीचा विद्यार्थी आहे. पुढच्या वर्षी आपल्या दोघांचीही 'बोर्ड'ची परीक्षा आहे. माझी 12वीची परीक्षा आहे तर तुमची लोकसभेची, तुम्ही नर्व्हस आहात का? 
- मोदींनी विद्यार्थ्याला पुन्हा एकदा त्याचे नाव विचारले आणि त्याच्या प्रश्नाचे कौतूक केले. म्हणाले, असा घुमवून फिरवून प्रश्न विचारण्याची ताकद फक्त पत्रकारांमध्ये असते. मी तुमचा शिक्षक असतो तर सल्ला दिला असता की तुम्ही जर्नालिझममध्ये गेले पाहिजे.  
- विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'नेहमी शिकत राहा. नवीन आत्मसात करण्याची तयारी ठेवा. स्वतःमधील विद्यार्थ्याला जेवढे शक्य होईल तेवढे तरुण ठेवा. परीक्षा आणि गुण हे बाय-प्रोडक्ट समजावे. गुणांचा विचार करत बसलो तर आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे ते कदाचित मिळणार नाही. राजकारणातही मी याच सिद्धांतावर चालतो. माझी जेवढी क्षमता आहे, माझी जेवढी ताकद आहे, माझ्यात जेवढी ऊर्जा आहे तेवढी सव्वाशे कोटी जनतेसाठी लावत राहिल. निवडणूक येते जाते. निवडणुका तर बाय-प्रोडक्ट आहे.' असे सांगत ते म्हणाले आपले काम करत राहिले पाहिजे. तुमची परीक्षा तर वर्षातून एकदाच असते आमची रोज परीक्षा असते. देशात कुठे तरी एका नगरपालिकेची निवडणूक होत असते आणि तिथे जर आमचा पक्ष पराभूत झाला तर वृत्तपत्रात हेडिंग येतात की मोदींचा पराभव.
- मी राजकारणात असलो तरी राजकारण हे माझ्या स्वभावात नाही.  
- विद्यार्थ्यांनी सकारात्मकता आपल्यात बिंबवली पाहिजे, असे सांगत अटल बिहारी  वाजपेयी यांच्या कवितेचा ओळी त्यांनी ऐकवल्या. 'हार न मानूंगा...' 
- तुमच्या परीक्षेला शुभेच्छा माझ्या परीक्षेसाठी सव्वाशे कोटी देशवासियांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. तीच माझी ताकद आहे. 

 

 

स्टेट बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर सीबीएसई 5 मार्चपासून 
- सीबीएसई बोर्ड परीक्षांची आधीच घोषणा झाली आहे. 5 मार्चपासून सीबीएसईच्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांना सुरुवात होणार  आहे. 7 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर सीबीएसईने 10वीची परीक्षा अनिवार्य केली आहे. 
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड यांनी सेकेंडरी स्‍कूल सर्टिफिकेट (SSC) आणि हायर सेकेंडरी सर्टिफिकेट (HSC) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एसएससी परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 दरम्यान तर एचएससी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, किती आहे मोदींच्या पुस्तकाची किंमत आणि काय आहे त्यात...

बातम्या आणखी आहेत...