आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांची प्रकृती बिघडली, एअर अॅम्बुलन्सने दिल्लीला हलवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांची तब्येत अचानक बिघडली आहे. बिहामध्ये असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर उपचार करताना त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला हलवण्यात येत आहे. एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीला आणले जात आहे. 


तारीक अन्वर यांचे वय 66 वर्षे असून ते बिहारच्या कटिहारमधून लोकसभेचे खासदार आहेत. सोमवार रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचारही झाले. पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दिल्लीला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...