आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या ब्रँचमध्ये पीएनबी घोटाळा, तिला केले सील, CBI म्हणाले- नीरव मोदी टीमकडे बँकेचे पासवर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबी ब्रॅडी हाऊस ब्रँच सीबीआयने सील केली आहे. - Divya Marathi
पीएनबी ब्रॅडी हाऊस ब्रँच सीबीआयने सील केली आहे.

मुंबई/ नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ज्या ब्रीचकँडी शाखेत घोटाळा झाला ती बँक केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सील केली आहे. दुसरीकडे देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची टीम पीएनबीचे कॉम्प्यूयर सिस्टम यूज करत होती. लेटर ऑफ अंडरटेकिंग  (एलओयू) साठीचे सर्व लॉग-इन पासवर्ड हे मोदी आणि त्याच्या टीमकडे होते. पीएनबीचे माजी उपमहाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, सीडब्ल्यूओ मनोज खरात, आणि नीरव मोदीचे ऑथराइज्ड सिग्नेटरी हेमंत भट्टने चौकशीत हा खुलासा केला आहे. नीरव आणि मेहुल चौकसी यांच्याशी संबंधीत 200 पेक्षा जास्त कंपन्यांची चौकशी सुरु आहे. 

हाँगकाँग मधील 5 बँक शाखांचे अधिकारी शंकेच्या घेऱ्यात 
- एसबीआय, अलाहाबाद बँक, यूनियन बँक, यूको आणि एक्सेस बँकेच्या हाँगकाँग शाखेतील अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. याच बँकांमधून नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना एलओयूच्या आधारे कर्ज देण्यात आले. 
- रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जेम्स-ज्वेलरी क्षेत्रासाठी एलओयूची मर्यादा 90 दिवसांची असते. मात्र पीएनबी अधिकाऱ्यांनी हे एलओयू 365 दिवसांसाठी जारी केले.
- याकडे इतर बँकेच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. हाँगकाँग मधील बँक अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 
- हाँगकाँग मध्ये 11 भारतीय बँकांच्या शाखा आहेत.

बातम्या आणखी आहेत...