आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीकटवर्तीयांनी काढले होते आक्षेपार्ह Photo-Video, त्यामुळे तणावात होते भय्यू महाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - भय्यू महाराजांच्या विसरा रिपोर्टमध्ये विष किंवा इतर केमिकलचा उल्लेख नाही. पोलिसांची चौकशीही जवळपास पूर्ण झाली असून कौटुंबीक कलहच आत्महत्येला कारणीभूत असल्याचे मानले जातेय. आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काहींनी आजारपणाचा तर काहींनी आश्रम तसेच ट्रस्टच्या आर्थिक स्थितीचा तणाव हे कारण सांगितले आहे. पण अद्याप महाराजांनी आत्महत्या का केली याचे ठोस कारण समोर आलेले नाही. 


नीकटवर्तीयांकडे होते आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ..
पोलिस अधिकारी मनोज रत्नाकर यांनी सांगितले की, सध्या तरी कौटुंबीक तणाव हेच कारण समोर येत आहे. आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणाचा पुरावा मिळालेला नाही. फिंगर प्रिंट रिपोर्टमध्येही ज्या पेनने सुसाइड नोट लिहिले त्यावर, गनवर, टेबलवरील पॅडवर किंवा इतर ठिकाणी इतरांचे फिंगर प्रिंट आढळलेले नाहीत. सुत्रांच्या मते, महाराजांबरोबर राहणाऱ्यांनी त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केलेले होते. त्यामुळेही महाराज तणावात असायचे. 

 

17व्या दिवशी समोर आले लेटर 
आत्महत्येच्या 17 व्या दिवशी पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले. हे 15 पानी लेटर मिळाल्यानंतर गुरुवारी भय्यू महाराजांच्या एका नीकटवर्तीयाने पोलिस महानिरीक्षकांची भेट घेतली होती. त्याने सांगितले की, आत्महत्येच्या महिनाभरापूर्वी त्याची भय्यू महाराजांशी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी आयुषी आणि कुहूच्या वादाचा सणाव सहण होत नसल्याने मी स्वतःला गोळी मारुन घेईल, असे सांगितल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. सुत्रांनी सांगितले की, या व्यक्तीने भय्यू महाराज दवाखान्यात अॅडमिट असताना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांची ही चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी आश्रमात जाऊन आयुषीला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा फायदा झाला नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मात्र अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे म्हटले आहे. 

 

पत्रात अनेक खुलासे 
पोलिसांना मिळालेल्या निनावी पक्षात महाराजांबाबत अनेक महत्त्वाची माहिती आहे. महाराजांना काय आवडायचे काय नाही, इथपासून त्यांचे आणि आयुषी यांचे संबंध असे उल्लेख त्यात आहे. आयुषी महाराजांवर हुकूम गाजवत होत्या असा उल्लेखही पत्रात आला आहे. पत्रात अशाही काही प्रसंगांचा उल्लेख आहे, ज्यानंतर महाराजांना सेवादारांसमोर जायलाही लाज वाटायची. 


पोलिस तपासामध्ये महाराजांच्या नीकटवर्तीयाने दिलेल्या माहितीचा समावेश कऱणार असल्याची माहिती मिळाली आहे. एखाद्याने पोलिसांना समोर येऊन माहिती दिली तर, महाराजांचा अपमान करून त्यांचा तणाव वाढवणाऱ्यांवर कारवाई करता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...