आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari : पोलिसांनी एका बाबाला घेतले ताब्यात, बहीण म्हणाली ही आत्महत्या नव्हे Murder

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी एका बाबाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तर कुटुंबातील प्रमुख भूपी यांची बहीण सुजाता यांनी ही आत्महत्या नसून मर्डर असल्याचा आरोप केला आहे. प्रकरणाच्या तपासात एकापाठोपाठ एक अनेक गूढ बाबी समोर येत आहेत. मृतांच्या घरातील रजिस्टरमध्ये लिहिलेला मजकूर तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेकडे बोट दाखवतो. त्यात आता पाईपचा अँगल समोर आला आहे. 

 

काय म्हणाल्या सुजाता...

मृतांमध्ये समावेश असलेल्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ नारायण देवी यांची एक मुलगी पानीपतमध्येही राहते. सुजाता असे त्यांचे नाव आहे. सुजाता यांनी हा प्रकार म्हणजे सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. या कुटुंबातील लोकांना बाबा लोकांविषयी चीड होती. घरात लग्नाची तयारी सुरू होती, ते आत्महत्या कशी करतील, असे सुजाता यांनी म्हटले आहे. 


काय आहे पाईप प्रकरण 
- तपासात पोलिसांना मृतांच्या घराच्या बाहेरच्या बाजुला एका भिंतीवर आजुबाजुला 11 पाइप लावलेले दिसत आहेत. त्या पाईपमध्ये 4 सरळ आणि 7 पाईप फोल्ड असलेले आहेत. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. 
- ही सर्व परिस्थिती पाहता हे पाईप अंधश्रद्धेचे प्रतिक समजले जात आहेत. त्याचे आणखी एक कारण म्हणजे, या पाईपातून पाणी बाहेर आल्याच्या खुणा नाहीत. 


सामुहिक आत्महत्या असेल तर.. 

>> 11 जण आत्महत्येला तयार कसे झाले? हा प्रश्न आहे. कारण शेजाऱ्यांच्या मते या कुटुंबात पुढील महिन्यात लग्न होणार होते. आर्थिक स्थिती चांगली होती. मग सगळे आत्महत्येला कसे तयार होणार. हात पाय बांधल्याच्या प्रकारामुळे हे हत्येचे प्रकरण असल्याचा संशय आहे. 
>> गेल्या महिन्यातच दोन्ही भावांनी 20 लाख रुपये खर्चून घराचे नुतणीकरण केले होते. पुढच्या महिन्यात मुलीचे लग्न होते. मग तिला आत्महत्येत का सहभागी करून घेतले?  
>> कौटुंबीक कलह नव्हता किंवा आर्थिक तंगी नव्हती मग आत्महत्या का केली? असा प्रश्न असून कुटुंबातील एखाद्याने अंधश्रद्धेला बळी पडत हत्या केल्याची शक्यताही व्यक्त होतेय. एखाद्या बाबाने माइंड वॉश करून मोक्ष प्राप्तीसाठी असे करण्यास सांगितले असू शकते. मृतांपैकी काहींच्या गळ्यातील ओढण्यांवर धार्मिक संदेश दिसले आहेत. 
>> शेजारी अनभिज्ञ कसे? संपूर्ण कुटुंबाने नियोजनबद्धरित्या हे पाऊल उचलले. तोंला टेप, कानात कापूस, हात बांधलेले होते. लोकांनी तर कुटुंबातील लोकांना रात्री 11 पर्यंत फिरतानाही पाहिले होते. त्यामुळे कोणाला काही कळले नसावे. 


हत्येच्या संशयावर समोर येणारे प्रश्न... 

>> मर्डर केला तर कानात कापूस कशासाठी?तोंडावर, डोळ्यावर पट्टी कुणाला शुद्ध आली तर आरडाओरड नको म्हणून असू शकते. पण कानात कापूस कसासाठी हे लक्षात येत नाही. 
>> घरात चोरी झाली नाही, मग हत्येचा उद्देश काय? संपत्तीच्या आमीषाने हत्या होऊ शकते. पण भावांमध्ये जराही वाद नव्हता. दोघांची स्वतंत्र दुकाने होती. सर्व काही सुरळीत होते. 
>> प्रेम प्रकरण असले तर पुरावा का नाही? एखादा मुलगा या कुटुंबातील मुलीवर एकतर्फी प्रेम करत असेल आणि त्याने असे केलेले असण्याची सक्यता आहे. पण तसे काही पुरावे मिळालेले नाहीत. 
>> वीज जाण्याचे गूढ ? घराच्या बाल्कनीजवळ एक वीजेचा खांब आहे. एका शेजाऱ्याने सांगितले की, शनिवारी रात्री बारा ते तीन वाजेदरम्यान लाइट नव्हती. हा एखादा कट असू शकतो. 

 

 

बातम्या आणखी आहेत...